Venus Transit In Kumbh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार, कोणताही ग्रह ज्यावेळेस राशी किंवा नक्षत्र परिवर्तन करतो तेव्हा त्याचा प्रभाव मानवी जीवनावर होत असतो. काही ग्रहांचा प्रभाव हा नकारत्मक असल्याने त्यांचा प्रभाव काळ सुरु असल्यास आपल्याला कंटाळा, आळस जाणवू शकतो. तर काही ग्रहांच्या संक्रमणाने राशींवर सकारात्मक प्रभाव सुरु होतो, यामुळे या मंडळींना अधिक उर्जावान जाणवते व काम वेगाने केले जाते . अशावेळी योगायोगाने धनलाभ व प्रगती सुद्धा होऊ शकते. येत्या २२ जानेवारीला धन व वैभवदाता शुक्र ग्रह हा शनिच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. हे शुक्र गोचर ३ राशींसाठी अत्यंत शुभ व लाभदायक ठरू शकते. यामुळे ३ राशींच्या भाग्यात प्रचंड धनलाभ व श्रीमंतीचा योग तयार होत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मकर (Makar Zodiac)

शुक्राचे गोचर कुंभ राशीत होणार असले तरी मकर राशीसाठी हा काळ अत्यंत शुभ असू शकतो. शुक्र ग्रह आपल्या राशीच्या दुसऱ्या स्थानावर प्रभावी असणार आहे. ज्योतिषांच्या मते हे धनप्राप्तीचे स्थान मानले जाते. आपल्याला या काळात प्रचंड व अनपेक्षित धनलाभ होऊ शकतो. आपण उधार दिलेले पैसे न मागता पार्ट मिळू शकतात. तसेच आपल्या आर्थिक मिळकतीचे स्रोत वाढू शकतात. हा काळ नवे साहस अनुभवण्याचा असू शकतो. अविवाहित व लग्न इच्छुक व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

वृषभ (Taurus Zodiac)

शुक्र ग्रहाचे गोचर वृषभ राशीसाठी वरदान सिद्ध होऊ शकते. शुक्र आपल्या राशीच्या ११ व्या स्थानी गोचर करून प्रभाव करणार आहे. हे स्थान इनकम व धनलाभाचे स्थान मानले जाते. आपल्याला येत्या काळात वैभव लाभू शकते याचा अर्थ तुमच्याकडे असणारे धन चिरकाळ टिकून राहण्याची चिन्हे आहेत. आपल्याला शेअर बाजारात गुंतवणुकीचा लाभ होऊ शकतो मात्र तुम्हाला नीट तपास व चौकशी करण्याची गरज आहे. या काळात तुम्हाला नव्या नोकरीची ऑफर येऊ शकते.

हे ही वाचा<< १३ मार्च २०२३ पर्यंत ‘या’ ३ राशींना होणार बक्कळ धनलाभ? मंगळ व लक्ष्मी कृपेने तुम्हीही होऊ शकता प्रचंड श्रीमंत

मिथुन (Gemini Zodiac)

शुक्र ग्रहाचे राशी परिवर्तन हे मिथुन राशीसाठी लाभदायक ठरू शकते. शुक्र आपल्या राशीच्या नवव्या स्थानी गोचर करणार आहे हे स्थान भाग्य व परदेश वारीशी संबंधित आहे. यामुळे ज्यांना परदेशवारीची इच्छा आहे त्यांना लवकरच संधी मिळू शकते. आपल्या इच्छा पूर्ण करणारा हा लाभदायक काळ असू शकतो. करिअरमध्ये प्रचंड प्रगतीसाठी काही निर्णय घेणे आवश्यक असेल तुमच्या मनाचा कौल ऐकणे फायद्याचे ठरू शकते. आपल्याला वाडवडिलांकडून प्रचंड धनलाभ होऊ शकतो.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani favorite rashi gets shukra transit in kumbh these zodiac sign could get huge money and luck marathi astrology svs