Shani Dev Vakri In Meen and Jupiter Rise Impact in Marathi: ज्योतिषशास्त्रात ग्रहांची स्थिती आणि त्यांचे परस्पर योग महत्त्वपूर्ण मानले जातात. अशाच एका दुर्मीळ योगाला आपण लवकरच साक्षीदार होणार आहोत. तब्बल ५०० वर्षांनंतर शनिदेव वक्री होणार असून त्याच काळात देवगुरू बृहस्पती उदयाला येणार आहेत. शनि वक्री व गुरूचा उदय एकाच वेळी खूपच दुर्मीळ आहे. शनिदेव १३ जुलै रोजी मीन राशीत वक्री होतील, तर १४ जुलै रोजी गुरूचा मिथुन राशीत उदय होईल. या दोन घटनांचा एकत्र परिणाम अत्यंत प्रभावी मानला जातो. त्यामुळे काही राशींना सुगीचे दिवस अनुभवता येणार आहे. या नशीबवान राशी कोणत्या व त्यांच्या नशिबात नेमकं काय लिहून ठेवलंय हे पाहूया..

शनि-गुरूच्या संयोगातून धनप्राप्ती!

वृषभ (Taurus)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनी वक्री आणि गुरु ग्रहाचा उदय वृषभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरु शकतो. तुम्हाला नशिबाची चांगली साथ लाभू शकते. तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळू शकते. या काळात तुम्हाला धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा खूपच चांगली होऊ शकते आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळू शकतात. जे तरुण नोकरीच्या शोधात आहेत त्यांना लवकरच चांगली नोकरी मिळण्याची शक्यता आहे. या काळात उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर खुले होऊ शकतात. याकाळात तुमची रखडेलेली कामे पूर्ण होऊ शकतात. समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. तुमचे प्रेम जीवन खूप चांगले होईल.

मिथुन (Gemini)

ज्योतिषशास्त्रानुसार, ५०० वर्षानंतर जुळून आलेल्या या महासंयोगामुळे मिथुन राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. या काळात तुम्हाला गुंतवणुकीच्या चांगल्या संधी मिळू शकतात. तुमच्या कामामध्ये तुमची चांगली प्रगती दिसून येऊ शकते. या राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायात खूप फायदा होऊ शकतो. या काळात तुम्हाला पैसे कमावण्याच्या अनेक संधी मिळू शकतात. या राशीच्या लोकांना प्रत्येक क्षेत्रात प्रचंड यश मिळू शकते. तसेच, नोकरदार वर्गातील लोकांनाही प्रमोशन मिळू शकतं. या काळात तुमचं आरोग्यही ठणठणीत राहील. तुमच्या कुटुंबात आनंदी वातावरण पाहायला मिळेल.

धनू (Sagittarius)

ज्योतिषशास्त्रानुसार, शनी वक्री आणि गुरु ग्रहाचा उदय धनू राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकते. व्यवसायातून चांगला लाभ मिळू शकतो. मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभही मिळू शकतो. नवीन नोकरीच्या शोधात असलेल्या नोकरदारांना या काळात मोठ्या कंपनीकडून जॉबच्या संधी मिळू शकतात. तसेच, अनेक दिवसांपासून रखडलेले तुमचे पैसे तुम्हाला परत मिळू शकतात. आर्थिक स्थितीत सुधारणा होऊ शकते. तुम्ही नवीन वाहन किंवा एखादी प्रॉपर्टी खरेदी करण्यास सक्षम असाल. परदेशात जाण्याची संधी चालून येऊ शकते. तुम्हाला कामाच्या ठिकाणी तुमच्या वरिष्ठांकडून पाठिंबा मिळू शकतो. मालमत्तेत वाढ होऊ शकते. वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील. तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदेल.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)