Shani Gochar Positive Impact: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ज्योतिषशास्त्रात शनीला खूप महत्वपूर्ण ग्रह मानले जाते. शनीला कर्मफळदाता आणि न्यायप्रिय देवता देखील म्हटलं जातं. शनी नेहमीच चांगले कर्म करणाऱ्या व्यक्तीना शुभ फळ प्रदान करतो. तर इतरांना विणाकारण त्रास देणाऱ्या आणि वाईट कर्म करणाऱ्यांवर शनीचा नकारात्मक प्रभाव पडतो. याव्यतिरिक्त शनीचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तनही खूप खास मानले जाते. शनी सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे; त्यामुळे त्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्यासाठी अडीच वर्षाचा कालवधी लागतो. तर एक नक्षत्रातून दुसऱ्या नक्षत्रात जाण्यासाठी एक वर्षाचा कालावधी लागतो.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, सध्या गुरूच्या पूर्वा भाद्रपद नक्षत्रामध्ये विराजमान असून तो येत्या २८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजून ५२ मिनिटांनी स्वतःच्या उत्तरा भाद्रपद या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार आहे. २७ नक्षत्रांपैकी हे २६ वे नक्षत्र आहे. या राशीचा स्वामी शनी असून रास मीन आहे. तसेच सध्या शनी मीन राशीतच विराजमान आहे. त्यामुळे शनीचा जबरदस्त शुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

शनी ‘या’ तीन राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकवणार

मिथुन

मिथुन राशीच्या व्यक्तींना शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्राच्या प्रवेश खूप सकारात्मक फळ देईल. या काळात भाग्याची पूरेपूर साथ मिळेल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. आर्थिक बाजू भक्कम होईल. या काळात तुमच्या आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील, करिअरमध्ये हवे तसे यश मिळविता येईल. व्यवसायात हवी तशी प्रगती पाहायला मिळेल. अविवाहितांना लग्नाचे प्रस्ताव येतील. कुटुंबातील अडचणी दूर होण्यास मदत मिळेल. वायफळ खर्चावर नियंत्रण येईल.

मकर

शनीच्या उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश मकर राशीच्या व्यक्तींना खूप लाभदायी ठरेल. मकर राशीच्या तिसऱ्या घरात शनीदेव विराजमान आहेत. नुकतीच या राशीची साडेसाती संपली आहे, ज्याचा शुभ प्रभाव तुमच्या आयुष्यावर पाहायला मिळेल. प्रत्येक क्षेत्रात यश मिळवाल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनाही शनीच्चा उत्तरा भाद्रपद नक्षत्रातील प्रवेश अत्यंत लाभदायी ठरेल. सध्या शनी कुंभेच्या दुसऱ्या घरात विराजमान असून कुंभ राशीसाठी शनीच्या साडेसातीचा तिसरा टप्पा सुरू आहे. त्यामुळे तुम्हाला आयुष्यात अनेक मोठे बदल पाहायला मिळतील. या काळात नव्या कामाची सुरुवात होईल. कामातील अडथळे दूर होतील. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. यावेळी तुमचे व्यक्तिमत्त्व सुधारेल. तुमचे प्रेमसंबंध चांगले होतील, नात्यात गोडवा येईल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani gochar 25 shani dev enter in uttarabhadrapada nakshatra these zodic get happiness and success in business sap