Shani-Mangal make navpancham yog: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो. ज्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे अनेकदा दोन ग्रहांची एकाच राशीत युतीदेखील निर्माण होते. ज्यामुळे काही शुभ योग किंवा राजयोग निर्माण होतात. सध्या शनी कुंभ राशीत विराजमान असून होळीनंतर तो मंगळ ग्रहाबरोबर नवपंचम राजयोग निर्माण करेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, ५ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजून ३१ मिनिटांनी शनी आणि मंगळ एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. ज्यामुळे नवपंचम राजयोग निर्माण होईल. या राजयोगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींना अनेक चांगले परिणाम पाहायला मिळतील.

नवपंचम राजयोग करणार चांदी

मेष

नवपंचम राजयोग मेष राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. आई-वडिलांचा आशीर्वाद तुमच्या पाठिशी असेल.

सिंह

सिंह राशींच्या व्यक्तींसाठी नवपंचम राजयोग अत्यंत फायदेशीर ठरेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल.

कन्या

कन्या राशीच्या व्यक्तींसाठीदेखील नवपंचम राजयोग अनेक चांगले परिणाम घेऊन येणारा ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. आरोग्य उत्तम राहील. वैवाहिक जीवन सुखाचे क्षण येतील.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shani mangal create navpancham rajayog these three zodiac signs will suddenly be wealthy fortune will shine sap