Shani Sade Sati 2025 Predictions: ज्योतिषशास्त्रानुसार शनीदेवाला न्यायाचे आणि कर्माचे दूत मानले जाते. ते आपल्या कर्मानुसार परिणाम देतात आणि प्रत्येकाच्या जीवनात सुख-दु:खाचे संतुलन साधतात, त्यामुळेच अनेक लोक शनीच्या ढैय्या, साडेसाती आणि महादशापासून फार दूर राहण्याचा प्रयत्न करतात. सध्या शनी मीन राशीत वक्री स्थितीत आहेत आणि जून २०२७ पर्यंत या राशीत भ्रमण करतील. वक्री चालीत सुमारे १३८ दिवसांच्या अंतरानंतर, २८ नोव्हेंबर २०२५ पासून शनी पुन्हा मार्गी होतील.
शनीची साडेसाती ही एक अशी खगोलशास्त्रीय घटना आहे, जी कोणत्याही व्यक्तीच्या जीवनात मोठा बदल घडवते. आयुष्याची दिशा, नशीब, करिअर, आरोग्य आणि नातेसंबंध या सर्वांची या काळात उलथापालथ होऊ शकते. शनी मार्गी होणे हे काहींसाठी शुभ संधी आणि सकारात्मक बदल घेऊन येते, तर काहींसाठी सावधगिरी बाळगण्याची वेळ असते. विशेषतः साडेसातीच्या प्रभावाखाली असलेल्या राशीच्या लोकांनी या काळात काळजी घेणे गरजेचे आहे. चला जाणून घेऊया कोणत्या राशींना विशेष दक्षता बाळगावी लागणार आहे.
शनीदेव कर्माचा हिशोब घेणार! ‘या’ राशीच्या लोकांनी राहावे सावध!
मेष (Aries)
मेष राशीच्या लोकांसाठी साडेसातीचा प्रभाव अजून चालू आहे. शनी मार्गी झाल्यानंतर हा काळ मिश्रित परिणाम देऊ शकतो. या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घाईघाईने घेणे टाळावे, अन्यथा नुकसान संभवते. कामाच्या ठिकाणी कष्ट आणि सातत्य आवश्यक राहील. घरातील नातेसंबंधात लहान-लहान गोष्टींवर मतभेद होण्याची शक्यता आहे.
मीन (Pisces)
मीन राशीच्या लोकांसाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो. शनी मार्गी झाल्यानंतर मानसिक ताण, आर्थिक अडचणी आणि कर्ज वाढण्याची शक्यता असते. आरोग्यावर दुर्लक्ष केल्यास त्रास होऊ शकतो. कौटुंबिक जीवनात गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि निर्णय घेण्यासाठी संयमाची आवश्यकता आहे.
कुंभ (Aquarius)
कुंभ राशीच्या लोकांवरसुद्धा साडेसातीचा परिणाम चालू आहे. आर्थिक संकट आणि आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. नोकरदारांना अधिक मेहनत करावी लागेल, तर व्यावसायिकांनी आर्थिक व्यवहारात काळजी घ्यावी. या काळात घरातील वृद्ध व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष देणे आवश्यक आहे.
शनी मार्गी होणे हा कालखंड काहींसाठी सुख, समाधान आणि प्रगती घेऊन येतो, तर काहींसाठी सावधगिरी बाळगण्याची वेळ असते. ज्यांना साडेसातीचा परिणाम आहे, त्यांनी संयम, मेहनत आणि योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)