Shani Dev Margi In Meen 2025: न्यायदेवता, कर्मदाता शनी हा नवग्रहांमधील सर्वात शक्तिशाली ग्रह मानला जातो. शनीची चाल ही अत्यंत संथ गतीची असून एका राशीतून दुसऱ्या राशीत जाताना शनीला किमान अडीच ते कमाल साडेसात वर्षांचा कालावधी लागतो. सध्या शनि महारांजांचे राशीपरिवर्तन मीन राशीत झाले आहे. ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रह एका विशिष्ट कालावधीनंतर आपली चाल मार्गी किंवा वक्री करत असतात. शनीदेव हे जेव्हा मार्गी किंवा वक्री होतात, तेव्हा काही राशींसाठी राजयोग निर्माण होतो. यंदा २०२५ च्या अखेरीस शनीदेव मार्गी चाल सुरु करणार असून, यामुळे धन राजयोग निर्माण होणार आहे. या शुभ राजयोगाच्या निर्मितीमुळे काही राशींचे भाग्य उजळण्याची शक्यता आहे. या राशींना मोठा धनलाभ होऊ शकतो. कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी जाणून घेऊयात..
शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशी होतील धनवान?
वृषभ राशी (Taurus)
धन राजयोगामुळे वृषभ राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. पैसा कमावण्याच्या अनेक वाटा या राशीच्या लोकांसाठी उपलब्ध होऊ शकतात. नवीन आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात मोठी प्रगती होऊन गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो. त्यामुळे उत्पन्नात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित मालमत्तेतून चांगला फायदा होऊ शकतो.
धनु राशी (Sagittarius)
धन राजयोगामुळे धनु राशीच्या लोकांना आनंदाचे दिवस पाहायला मिळू शकतात. भौतिक सुखसुविधा, वाहनप्राप्ती, मालमत्तेत गुंतवणूक आणि सामाजिक प्रतिष्ठा वाढवणारा हा काळ ठरु शकतो. खास करून प्रॉपर्टी, रिअल इस्टेटशी संबंधित काम करणाऱ्यांना विशेष लाभ होऊ शकतो. तसेच बेरोजगारांना नोकरीची संधी मिळू शकते. आर्थिक बाजू मजबूत होऊ शकते. घरगुती नातेसंबंध सुधारुन घरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळू शकते.
कुंभ राशी (Aquarius)
धन राजयोग कुंभ राशीच्या लोकांसाठी वरदानच ठरु शकतो. उत्पन्नाचे नवे स्रोत शोधू शकाल. करिअर आणि व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे. पदोन्नती मिळू शकते. तसेच खोळंबलेली कामं पूर्ण होऊ शकतात. या काळात आदर, मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळेल. सरकारी नोकरीसाठी प्रयत्न करत असलेल्या व्यक्तींना गोड बातमी मिळू शकते. या काळात संपत्ती वाढण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो.
(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)