ज्योतिषशास्त्रात शनिदेवाला विशेष स्थान आहे. शनिदेवाला कर्माचा दाता म्हटले जाते. शनिदेवाची कृपा ज्या राशींवर असेल त्यांची भरभराट होते. दुसरीकडे, शनिदेव ज्या राशींच्या आयुष्यात अशुभ स्तिथीत असेल त्यांच्या जीवनावर त्याचा वाईट परिणाम होतो असे मानण्यात येते. १७ जानेवारीला शनिदेव आपली राशी बदलणार आहेत. शनिदेवाचा कुंभ राशीत सर्वात मोठा प्रवेश होणार आहे. शनिदेवाचा कुंभ राशीत प्रवेश करण्याआधीचा काळ काही राशीसाठी शुभ असणार आहेत. तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी..
वृषभ राशी
१६ जानेवारी पर्यंत वृषभ राशीवर शनिदेवाची विशेष कृपा राहील. या काळात तुम्हाला कौटुंबिक जीवनाचा आनंद अनुभवता येईल. या काळात तुम्ही वाहन किंवा घर खरेदी करू शकता. यासोबत जे लोक शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत त्यांना याकाळात शनिदेवाची साथ मिळणार आहे. तसंच या काळात तुमच्याकडे भरपूर पैसा येऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती यावेळी मजबूत राहील. यासोबत रखडलेली कामही यावेळी पूर्ण होतील.
वृश्चिक राशी
वृश्चिक राशीवर शनिदेवाची विशेष कृपा असणार आहे. या काळात तुम्ही केलेल्या प्रत्येक कामात यश मिळेल. तसंच तुम्ही तुमच्या कुटुंबिया सोबत चांगला वेळ घालवू शकाल. याकाळात तुम्हाला नशिबाची चांगली साथ मिळेल. त्यासोबत तुम्ही यावेळी नवीन काम सुरू करू शकता ज्यामध्ये तुम्हाला शनिदेवाची साथ मिळेल. या काळात तुम्ही परदेशी प्रवास देखील करू शकता.
( हे ही वाचा: पुढील २ महिन्यात ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? गुरूदेव मिळवून देणार बक्कळ धनलाभाची संधी)
मीन राशी
शनिदेवाच्या कृपेने या राशीच्या लोकांना नशिबाची मजबूत साथ मिळेल. यासोबत जे लोक शिक्षण क्षेत्राशी निगडित आहेत त्यांना याकाळात शनिदेव यश मिळवून देणार आहेत. तसंच या काळात तुमच्यावर लक्ष्मी देवी प्रसन्न असेल. त्यामुळे या काळात पैशांची कमतरता भासणार नाही. जर तुम्ही नवीन व्यवसाय किंवा नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी शुभ असेल.
(वरील बातमी माहिती आणि गृहितके यांवर आधारित आहे)