Mahalakshmi Rajyog 2025: हिंदू धर्मात आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदेपासून ते नवमीपर्यंत शारदीय नवरात्र साजरी केली जाते. भारतात शारदीय नवरात्रीला महत्त्वाचे स्थान प्राप्त आहे. यंदा २२ सप्टेंबरपासून नवरात्रीला सुरुवात होणार असून संपूर्ण हा काळ ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोणातूनही अत्यंत महत्वाचा आहे. या काळात ग्रह-नक्षत्रांचे काही खास संयोग निर्माण होतील. ज्याचा प्रभाव १२ पैकी काही राशींच्या आयुष्यावर पाहायला मिळेल. हिंदू पंचांगानुसार, दरवर्षी ९ दिवस येणारी नवरात्री यंदा १० दिवस असणार आहे. कारण, यंदा तृतीया तिथी मोठी आहे. त्यामुळे २२ सप्टेंबर ते २ ऑक्टोबरपर्यंत नवरात्री साजरी केली जाईल.

नवरात्रीत रवि योग

नवरात्रीच्या काळात अनेक शुभ योग निर्माण होतात. ज्यात रवि योगही आहे. या योगाला खूप प्रभावी आणि शुभ मानले जाते. या योगात केलेल्या सर्व कामात यश मिळते. तसेच या योगात नवीन वस्तू खरेदी करणे लाभदायी मानले जाते.

नवरात्रीत महालक्ष्मी योग

नवरात्रीच्या काळात २४ सप्टेंबर रोजी चंद्रा तूळ राशीत प्रवेश होईल. या राशीत आधीपासूनच मंगळ ग्रह उपस्थित आहे. मंगळ-चंद्र जिथे एकत्र येतात तिथे महालक्ष्मी योग निर्माण होतो. हा योग सुख, संपत्ती आणि समृद्धी देणारा राजयोग आहे. हा योग तीन राशींसाठी अत्यंत आनंददायी असेल.

तूळ (Tula Rashi)

महालक्ष्मी राजयोग तूळ राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात तुमच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम पाहायला मिळेल. या काळात आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबात शुभकार्ये होतील. आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात प्रगती होईल, मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील.

मकर (Makar Rashi)

महालक्ष्मी राजयोग मकर राशीच्या व्यक्तींसाठी लाभदायक मानले जाईल. या काळात कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आरोग्य चांगले राहील. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. व्यापारी वर्गाला प्रत्येक कामात यश मिळेल.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीच्या व्यक्तींसाठीही महालक्ष्मी राजयोग फायदेशीर ठरले. या काळात तुम्हाला अनेक आकस्मिक धनलाभ होतील. प्रत्येक कामात कुटुंबीयांची साथ मिळेल. तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. दूरचे प्रवासही घडतील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. नव्या गोष्टींशी जोडले जाल. मानसिक आरोग्य उत्तम असेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)