Neech Bhang Rajyog 2025 : ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रहाला वैभव, संपत्ती, ऐश्वर्य, विलासितेचा कारक मानले जाते. शुक्र ग्रहाचा कला, संगीत, मनोरंजन व फॅशनशी संबंधित व्यवसायांवरदेखील प्रभाव पाडतो. म्हणूनच शुक्राची स्थिती बदलताच त्याचा थेट परिणाम १२ राशींच्या लोकांच्या जीवनावर कोणत्या ना कोणत्या प्रकारे दिसून येतो. सध्या शुक्र सिंह राशीत आहे; पण आज ९ ऑक्टोबर रोजी, त्याने कन्या राशीत प्रवेश केला आहे. सूर्य आधीच या राशीत असल्यामुळे शुक्र ग्रह सूर्यासोबत संयोग करून ‘नीचभंग राजयोग’ निर्माण करणार आहे.

ज्योतिषशास्त्रानुसार, शुक्र ग्रह आज ९ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजून ५५ मिनिटांनी कन्या राशीत प्रवेश केला आहे, जिथे आधीच सूर्यग्रहणाचा प्रभाव आहे, तिथे एक विशेष योग ‘नीचभंग राजयोग’ तयार होत आहे. ‘नीचभंग राजयोग’ तेव्हा तयार होतो जेव्हा एखादा ग्रह त्याच्या नीच (कमजोर) राशीत असतो; पण त्याच वेळी एखाद्या शुभ ग्रहाबरोबर एकत्र (युतीत) येतो. सध्या शुक्र ग्रह त्याच्या नीच राशीत आहे; पण तो सूर्याबरोबर युती करणार आहे. त्यामुळे काही राशींच्या लोकांना या काळात चांगला फायदा किंवा शुभ परिणाम मिळू शकतो.

कन्या – कन्या रास असणाऱ्यांच्या जीवनात आजपासून अनेक सकारात्मक बदल घडणार आहेत. नीचभंग या योगाच्या प्रभावाखाली, तुम्हाला विविध क्षेत्रांत असाधारण यश मिळण्याची शक्यता आहे. वैवाहिक समस्या हळूहळू दूर होतील आणि जोडीदाराशी तुमचे नाते अधिक घट्ट होईल. अविवाहित लोकांसाठी हा काळ शुभ राहील. लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात. साखरपुडा, लग्न-समारंभ आणि इतर कार्यक्रम पार पडू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींच्या पगारात वाढ होण्याची शक्यता; तर नवीन नोकरी शोधणाऱ्यांनाही नवीन संधी मिळू शकतात. व्यावसायिकांसाठी फायदेशीर काळ असेल. आरोग्याच्या बाबतीत सांगायचे झाल्यास उत्साही असाल आणि आत्मविश्वासही वाढेल.

धनू – धनू राशीच्या मंडळींसाठी नीचभंग राजयोग हा अनेक क्षेत्रांमध्ये शुभ ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी लक्षणीय प्रगतीची संधी, व्यवसायात यश, नोकरीत नवीन जबाबदाऱ्या सोपवल्या जाऊ शकतात, ज्यामुळे पदोन्नती किंवा ओळख मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. कला, लेखन, संगीत, अभिनय किंवा कोणत्याही सर्जनशील क्षेत्रात गुंतलेल्यांसाठी हा काळ अत्यंत फलदायी ठरेल. तुमचे कौतुक केले जाईल. तुमच्या कामामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ उत्तम असेल.

कुंभ – कुंभ राशीच्या आयुष्यात सकारात्मक परिणाम दिसून येतील. त्यांना अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ, भौतिक सुखसोईंचाही अनुभव घेता येईल. कुटुंबात दीर्घकाळापासून सुरू असणारे संघर्ष दूर होतील आणि घरात शांती नांदेल. नशिबाच्या साथीने तुमच्या आयुष्यात आनंद येऊ शकतो.