Mars Transit on Krishna Janmashtami 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे वेगवेगळे महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह हा वेळोवेळी एका ग्रहातून दुसऱ्या ग्रहात तसेच नक्षत्रात सुद्धा परिवर्तन करत असतो. साहस, पराक्रमाहचा ग्रह अशी ओळख असलेला मंगळ ग्रह आता राशी परिवर्तन करण्याच्या तयारीत आहे. या मंगळ गोचरामुळे काही राशींच्या कुंडलीत शुभ तर काहींच्या कुंडलीत अशुभ बदल दिसून येणार आहेत. यावर्षी कृष्ण जन्माष्टमीच्या मुहूर्तावर मंगळाची चाल बदलणार आहे ज्यामुळे १२ पैकी तीन राशी प्रचंड श्रीमंत होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्र अभ्यासकांच्या माहितीनुसार, २६ ऑगस्टला ग्रहांचा सेनापती मंगळ हा वृश्चिक राशीतून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. २६ ऑगस्टलाच जन्माष्टमीचा मुहूर्त सुद्धा आहे. मंगळ हा मुळातच मेष व वृश्चिक या राशींचा स्वामी आहे, त्यामुळे मिथुन राशीत प्रवेश केल्यावर याही राशींना काही प्रमाणात फायदा होणार आहेच. स्वतः लक्ष्मी दही साखरेचा प्रसाद देऊन या राशींना श्रीमंत बनवू शकते. या नशीबवान राशी कोणत्या हे पाहूया..

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जन्माष्टमीपासून दुःखातून मोकळ्या होतील ‘या’ तीन राशी

सिंह रास (Leo Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार सिंह राशीसाठी मंगळाचे गोचर हे खूपच शुभ सिद्ध होऊ शकते. या कालावधीत सिंह राशीच्या मंडळींना पद- प्रतिष्ठा वाढून धनलाभ होऊ शकतो. तुमच्या नावाचं महत्त्व वाढेल. कार्यक्षेत्रात प्रगतीचा योग आहे. तुम्ही स्वतःच्या बळावर केलेल्या कामातून जास्त फायदे होऊ शकतात. नव्या कल्पनांना अंमलात आणायला घाबरू नका. समाजात तुमच्या कामाचा सन्मान होऊ शकतो. धनलाभासाठी तुमचं साहसच पाठबळ देणार आहे पण गुंतवणुकीत साहस दाखवण्यापेक्षा सखोल अभ्यास आवश्यक असेल. शेअर बाजारात गुंतवणूक फायद्याची ठरू शकते.

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या मंडळींसाठी मंगळ गोचर लाभदायक आहे, कारण या राशीवर मंगळाचे प्रभुत्व आहे. जुन्या गुंतवणुकीचे लाभ तुम्हाला जन्माष्टमीपासून मिळू लागतील. तुम्ही आजवर ज्या मंडळींना शत्रू समजत होतात येत्या कालावधीत कदाचित त्यांनीच एखादी अनावधानाने किंवा जाणीवपूर्वक केलेली गोष्ट तुमचा फायदा करून देऊ शकते. नव्या घरात गृहप्रवेश करू शकता. एखाद्या प्रॉपर्टीमध्ये गुंतवणुकीचा विचार करू शकता. भावंडांसह चांगले संबंध ठेवावेत. या कालावधीत तुमचा आत्मविश्वास वाढणार आहे त्याबरोबरीने ज्ञान व संभाषण कौशल्यावर काम केल्यास येत्या काळात आपली ओळख पालटून जाऊ शकते. परदेशात जाण्याचा योग आहे.

हे ही वाचा<< १५ जुलै पंचांग: देवशयनी एकादशीआधीचा शेवटचा सोमवार १२ पैकी ‘या’ राशींना देणार लाभ, वाचा मेष ते मीन राशींचे भविष्य

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

ज्योतिषशास्त्रानुसार कन्या राशीच्या मंडळींना या कालावधीत हातात घेतलेल्या प्रत्येक कामात यश मिळू शकते, त्यामुळे धनलाभ होणे हे सुद्धा क्रमप्राप्त ठरेल. कामाच्या ठिकाणी आपले सहकारी व वरिष्ठांसह असणारे मतभेद कमी होऊ शकतात, आपल्याला त्यासाठी स्वतः पुढाकार घ्यावा लागेल. राजकारणात कार्यरत असलेल्या मंडळींना एखादे मोठे पद मिळू शकते. कर्मावर विश्वास दृढ होत जाईल. नोकरीत बदल घडू शकतो. आपल्याला वेळेनुसार भूमिका घ्याव्या लागतील. तुम्हाला एखाद्या मोठ्या कंपनीकडून नोकरीची ऑफर येऊ शकते. या कालावधीत मन संभ्रमित असेल म्हणूनच मानसिक स्थैर्य जपण्याचा प्रयत्न करावा. वैवाहिक आयुष्यात सुकर होईल.

(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shri krishna janmashtami 2024 dates shubh muhurta mangal gochar on 26th august to bless sinha kanya rashi ma lakshmi give more money svs