Shukra-Budh Gochar 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक महिना खास मानला जातो. कारण, प्रत्येक महिन्यात ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन आणि राशी परिवर्तन होते. ज्याचा शुभ-अशुभ प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर होतो. २०२५ चा जून महिना खूप विशेष मानला जात आहे. कारण या महिन्यात मोठ्या ग्रहांचे राशी परिवर्तन होणार आहे. ज्याचा सकारात्मक प्रभाव १२ राशींवर पडू शकतो.

पंचांगानुसार, जूनमध्ये ग्रहांचा राजकुमार दैत्यगुरू शुक्र आणि बुध एक वर्षानंतर स्वराशीमध्ये प्रवेश करणार आहेत. शुक्र आपल्या वृषभ तर बुध आपल्या मिथुन राशीत तर राशीत प्रवेश करणार आहे.

‘या’ तीन राशींचे आयुष्य चमकणार

तूळ (Tula Rashi)

या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. भौतिक सुखात वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो. या काळात मुलांकडून आनंदी वार्ता येतील.

वृषभ (Vrushbh Rashi)

जून महिन्यातील ग्रहांचे राशी परिवर्तन वृषभ राशीसाठी फायदेशीर ठरेल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

कुंभ (Kumbha Rashi)

कुंभ राशीलाही ग्रहांच्या राशी परिवर्तनामुळे आकस्मिक धनलाभ होतील. या काळात अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. या काळात समाजात मान-सन्मान प्राप्त कराल. नव्या वस्तू खरेदी करू शकाल. आयुष्यात सुख-समृद्धी वाढेल. कुटुंबीयांसोबत प्रवास घडेल. नोकरीत पदोन्नती मिळण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण असेल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)