Shukra Ast in Mesh: ज्योतिषशास्त्रानुसार नऊ ग्रहांमुळे आणि त्याचा ठराविक वेळेनंतर बदलणाऱ्या स्थितीमुळे जाचकाच्या आयुष्यावर परिणाम होतो. ज्योतिषशास्त्रात शुक्र ग्रह हा धन, विलास, भौतिक सुख, प्रेम यांचा कारक मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार एप्रिलच्या शेवटी म्हणजेच २८ एप्रिल रोजी सकाळी ०७.२७ वाजता शुक्र मेष राशीत अस्त स्थितीत येणार आहे. शुक्राच्या अस्तानंतर काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. चला तर पाहूया कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मेष राशी

शुक्रदेवाच्या कृपेने मेष राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. शेअर बाजार आणि लॉटरीमध्ये फायदा होण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होऊ शकतात. विद्यार्थी स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात. अडकलेले पैसेही परत मिळू शकतात. काही नवीन स्त्रोतांकडून आर्थिक लाभ होऊ शकतो. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होण्याची शक्यता आहे. तुम्हाला अनपेक्षित पैसे मिळू शकतात. कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा : १० मे पासून ‘या’ राशी होणार प्रचंड श्रीमंत? २ वेळा बुधदेव गोचर करताच येऊ शकतात सोन्यासारखे दिवस )

मिथुन राशी

शुक्रदेवाच्या कृपेने मिथुन राशीच्या लोकांना नोकरी आणि व्यवसायातही यश मिळण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून यावेळी फायदा होऊ शकतो. जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात लाभ मिळण्याची शक्यता आहे. तुमच्यासाठी उत्पन्नाचं नवीन स्रोत उघडू शकतात. व्यापाऱ्यांना चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला बढती किंवा पगारवाढीचा लाभ मिळू शकेल. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो. संपत्तीत वाढ होऊ शकते. राजकारणातील लोकांना काही पद मिळू शकते. 

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांना शुक्रदेवाच्या कृपेने सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. जीवनातील अडथळे दूर होऊन प्रगतीकडे वाटचाल सुरू होऊ शकते. मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होऊ शकतो. अडकलेले पैसे परत मिळू शकतात. नवीन नोकरी मिळू शकते. आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. या काळात वाहनाचे सुख मिळू शकते. अविवाहित लोकांचे लग्न ठरण्याचे योग जुळून येऊ शकतात. समाजात मान-सन्मान वाढू शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)