Shukra Create malavya rajyog 2025 in November: ज्योतिषशास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन करतो ज्याचा शुभ प्रभाव १२ पैकी काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल. ऑक्टोबरप्रमाणे नोव्हेंबरमध्येही काही ग्रहांचे राशी परिवर्तन होईल. ज्यामध्ये दैत्यगुरू शुक्राचे परिवर्तन अत्यंत महत्वपूर्ण मानले जाईल. कारण, या महिन्यात प्रेम, सौंदर्य आणि सुखाचा कारक ग्रह शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल. यामुळे मालव्य राजयोग निर्माण होईल. सध्या शुक्र कन्या राशीत विराजमान असून २ नोव्हेंबर रोजी तो आपली स्वराशी असलेल्या तूळ राशीत प्रवेश करेल, या राशीत तो २५ नोव्हेंबरपर्यंत वास करेल. त्यामुळे २३ दिवसांपर्यंत मालव्य राजयोग राहील. या राजयोगाच्या शुभ प्रभावाने नक्कीच काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.

मालव्य राजयोग कधी निर्माण होतो?

मालव्य राजयोग शुक्र ग्रहांशी संबंधित आहे. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र लग्न भावापासून किंवा चंद्रापासून १,४,७,१० व्या घरात वृषभ, तूळ किंवा मीन राशीत स्थित असतो तेव्हा कुंडलीत मालव्य राजयोग निर्माण होतो.

मालव्य राजयोग करणार मालामाल

तूळ (Tula Rashi)

तूळ राशीच्या व्यक्तींना मालव्य राजयोगाचा शुभ परिणाम अनुभवायला मिळेल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. या काळात तुमच्या उत्पन्नात आणि भौतिक सुखात वाढ होईल. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.

धनु (Dhanu Rashi)

धनु राशीच्या व्यक्तींना मालव्य राजयोग प्रत्येक क्षेत्रात यश देईल. या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात प्रचंड यश मिळेल आणि उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. तसेच, बेरोजगार लोकांना यावेळी नवीन नोकरी मिळू शकते. त्याचबरोबर नोकरदार लोकांना प्रमोशन मिळू शकते. तसेच, यावेळी, तुमच्या वडिलांबरोबरच्या नातेसंबंधात सुधारणा होईल. तुमचा मान-सन्मान वाढेल. कुटुंबातील व्यक्तींसोबत फिरायला जाल, आर्थिक धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे.

मकर (Makar Rashi)

मकर राशीच्या व्यक्तींना मालव्य राजयोग अत्यंत फायदेशीर आहे. हा योग या राशीसाठी खूप अनुकूल ठरेल. या काळात तुमच्या उत्पन्नात प्रचंड वाढ होईल. भौतिक सुखात वाढ होईल. तसेच उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. तुमची आर्थिक स्थिती पूर्वीपेक्षा चांगली होईल आणि तुम्ही जमीन आणि वाहन खरेदीच्या दिशेने वाटचाल कराल. जर तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर तुम्हाला चांगला नफा मिळेल. निर्यात आणि आयात व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळू शकतो.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)