ज्योतिषशास्त्रात शुक्र हा सुख, संपत्ती, वैभव आणि ऐशोआराम देणारा ग्रह मानला जातो. कुंडलीत शुक्र शुभ असेल तर व्यक्ती विलासी जीवन जगू शकते. त्याला कशाचीही कमतरता भासत नाही असं मानलं जातं. तर अशुभ शुक्र तणावग्रस्त जीवन देऊ शकतो. अशातच आता ऑक्टोबरच्या सुरुवातीला शुक्राचे गोचर होणार आहे. सध्या शुक्र कर्क राशीत असून तो २ ऑक्टोबर २०२३ रोजी तो सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्र एका राशीत सुमारे २३ दिवस राहतो. त्यामुळे संपूर्ण ऑक्टोबर महिन्यात शुक्र सिंह राशीत राहून काही राशीच्या लोकांवर विशेष कृपा करु शकतो. यातील ३ राशीच्या लोकांना शुक्र खूप पैसा, सुख-सुविधा आणि करिअरमध्ये प्रगतीची संधी देऊ शकतो. तर या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मेष रास –
मेष राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर लाभदायक ठरु शकते. या काळात तुमच्यासाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होऊ शकतात. तसचे तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकता. या काळात तुमच्या जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. तसेच तुम्ही या महिन्यात लांबच्या प्रवासाला जाऊ शकता
वृषभ रास –
वृषभ राशीचा स्वामी शुक्र आहे त्यामुळे शुक्राचे गोचर या राशीच्या लोकांना खूप लाभ देणारे ठरु शकते. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत सकारात्मक परिणाम मिळण्याची शक्यता आहे. या काळात नवीन घर किंवा कार खरेदी करू शकता. तसेच तुम्हाला मालमत्तेतून लाभ होऊ शकतो. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होण्यासह तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊन जुन्या समस्या दूर होण्याची शक्यता आहे. शिवाय करिअरमध्येही नवीन संधी मिळू शकतात.
सिंह रास –
शुक्र गोचर सिंह राशीच्या लोकांना चांगला लाभ देऊ शकते. या गोचर काळात तुमचे नशीब तुम्हाला चांगली साथ देऊ शकते. तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होण्यासह व्यवसायातूनही मोठा नफा मिळण्याची दाट शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ होऊ शकतो तसेच अचानक आर्थिक लाभही होऊ शकतो.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra gochar 2023 in the next 5 days the fate of the people of these zodiac signs will change possibility of great success in business with immense wealth jap