Shukra Gochar 2023: शुक्र ३० मे २०२३ रोजी कर्क राशीत प्रवेश करणार आहे. कर्क राशीतील शुक्राचे गोचर काही राशींना आर्थिक यश आणि समृद्धी देऊ शकते. शुक्र हा विलास, समृद्धी आणि आर्थिक स्थिरतेचा कारक मानला जातो. अनेक राशींसाठी शुक्राचे गोचर फायदेशीर ठरु शकते. शुक्र या राशींना आर्थिक समृद्धी तर धनाची देवी लक्ष्मी त्यांना संपत्ती, ऐश्वर्य प्रदान करु शकते. या भाग्यवान राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया.
मिथुन –
मिथुन राशीच्या लोकांसाठी शुक्र ५ व्या आणि १२ व्या स्थानाचा स्वामी होणार आहे. तो उत्पन्न आणि कुटुंबाच्या दुसऱ्या स्थानी गोचर करेल. दुसऱ्या स्थानी शुक्र तुम्हाला हुशारीने विचार करण्यास आणि बुद्धीने पैसे कमविण्यास मदत करु शकतो. जर एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र चांगल्या स्थितीत असेल तर या काळात त्यांनाभरपूर पैसा आणि संपत्ती मिळू शकते. तुम्ही कौटुंबिक व्यवसाय करत असताल तर या कालावधीत तुम्हाला अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता आहे. तसेच पार्टनरशीपमध्ये व्यवसाय करणाऱ्यांना भरपूर नफा होऊ शकतो.
हेही वाचा- येत्या २५ दिवसांत ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? सुर्यदेवाच्या कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता
कर्क –
कर्क राशीच्या लोकांसाठी विलास आणि लाभाशी संबंधित दोन अत्यंत महत्त्वाच्या स्थानाचा स्वामी शुक्र आहे. कर्क राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो, कारण धनाची देवी लक्ष्मीचा आशीर्वाद त्यांना मिळू शकतो. या काळात तुम्ही मालमत्ता आणि मोठ्या प्रमाणात पैसे मिळवू शकता. तसेच तुम्हाला अचानत धनलाभ होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी तुमचे वरिष्ठांशी संबंध सुधारु शकतात, ज्याचा तुम्हाला अनेक प्रकारे फायदा होऊ शकतो.
कन्या –
कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्र दुसऱ्या आणि नवव्या स्थानाचा स्वामी बनणार आहे आणि कन्या राशीसाठी तो धन योग निर्माण करत ११ व्या स्थानी गोचर करणार आहे. त्यामुळे हा काळ कन्या राशींच्या लोकांना आर्थिकदृष्ट्या खूप फायदेशीर ठरु शकतो. या काळात लक्ष्मी देवीचा आशीर्वाद तुमच्यावर राहू शकतो. जे व्यवसाय करतात, त्यांचा नफा अनेक पटींनी वाढण्याची शक्यता आहे. खाजगी क्षेत्राशी संबंधित लोकांना वेतनवाढ, बोनस किंवा प्रमोशन मिळू शकते. नोकरीच्या ठिकाणी तुमचे स्थान, मान आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे.
(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)