Shukra Gochar in Mesh: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार सुख आणि समृद्धीचा कारक शुक्र ग्रह जेव्हा जेव्हा संक्रमण करतो तेव्हा सर्व राशींवर त्याचा परिणाम होतो. ज्योतिषानुसार, शुक्र ग्रह २४ एप्रिल रोजी रात्री ११ वाजून ५८ मिनिटांनी मीन राशीतून मेष राशीत प्रवेश करेल. १८ मे पर्यंत शुक्र याच राशीत विराजमान असतील. शुक्राचं गोचर प्रेम, विवाह आणि सुख-सृमद्धीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. शुक्र हा सौंदर्य, आनंद, वाहन, संपत्ती, कला आणि व्यावसायिक संबंधाचा कारक आहे. शुक्राच्या शुभ प्रभावामुळे माणसाला सर्व प्रकारच्या सुखात वाढ होते. या शुक्राचं होणारं गोचर काही राशींच्या व्यक्तींसाठी फार लाभदायक ठरु शकते. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या व्यक्तींना याचे सकारात्मक परिणाम मिळू शकतात.

‘या’ राशींचे भाग्य चमकणार?

मेष राशी

शुक्रदेवाच्या गोचरमुळे मेष राशीच्या लोकांना मोठा फायदा होऊ शकतो. शुक्राच्या प्रभावामुळे तुमच्या सुख-सुविधांमध्ये वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. पैशाची आवक वाढू शकते. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: १९ मे पासून ‘या’ राशी होणार श्रीमंत? १२ वर्षांनी दोन ग्रहांच्या युतीने शुभ योग घडून येताच मिळू शकतो अपार पैसा )

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांना धनलाभ होऊ शकतो. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. मान-सन्मानात वाढ होऊ शकते. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकणार आहे.

मिथुन राशी

मिथुन राशीच्या लोकांना यावेळी भौतिक सुख मिळू शकतं. शेअर बाजाराशी संबंधित गोष्टींमध्ये यश मिळू शकते. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो. तुम्हाला अनपेक्षित पैसेही मिळू शकतात. या काळात तुम्ही नोकरी किंवा व्यवसायासाठी प्रवास करू शकता. 

कर्क राशी

कर्क राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. पैसा आणि आर्थिक बाबींमध्ये सुधारणा होऊ शकते. तुमची कोणतीही योजना यशस्वी होऊ शकते.  

(हे ही वाचा: २२ दिवस ‘या’ राशींना मिळणार चांगला पैसा? सूर्यदेवाच्या कृपेने लक्ष्मी येऊ शकते दारी )

सिंह राशी

सिंह राशीच्या लोकांना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात. यावेळी तुम्हाला अनपेक्षित आर्थिक लाभ होऊ शकतो. तुम्हाला भागीदारीत यश मिळू शकते. व्यवसायात अपार यश मिळून तुम्हाला आर्थिक लाभही मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरु शकतो.

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांसाठी शुक्राचे गोचर लाभदायी ठरु शकते. व्यवसाय करणाऱ्या लोकांनाही अचानक आर्थिक लाभ होऊ शकतो. या काळात या राशीच्या लोकांच्या भौतिक सुखसोयींमध्ये वाढ होऊ शकते. प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. अविवाहित लोकांसाठी लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)