Malavya Rajyog in Tula: वैदिक ज्योतिष्य शास्त्रानुसार, प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर त्यांच्या राशीमध्ये बदल करतात. ग्रहांच्या या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर काही ना काही परिणाम होत असतो. शुक्र एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी सुमारे एक महिना लागतो. आता धन दाता शुक्र ग्रह १८ सप्टेंबरला आपल्या तूळ राशीत प्रवेश करणार आहेत. शुक्र स्वतःच्या राशीत प्रवेश करताच ‘मालव्य नावाचा राजयोग’ निर्माण होईल. मालव्य राजयोग हा शुभ योगांपैकी एक योग आहे. या राजयोगामळे काही राशींच्या लोकांचे नशिबाचे बंद दरवाजे उघडू शकतात. शुभ राजयोगामुळे काही लोकांना अनपेक्षित आर्थिक लाभ मिळू शकतो. जाणून घेऊया कोणत्या राशींच्या लोकांना लाभ होऊ शकतो.

‘या’ राशींना बक्कळ धनलाभ होणार?

मेष राशी (Aries Zodiac)

मालव्य राजयोग बनल्याने मेष राशीच्या मंडळींसाठी चांगले दिवस सुरु होऊ शकतात. या काळात तुम्ही कामाच्या संदर्भात प्रवासाला जाण्याचीही शक्यता आहे. आर्थिक स्थिती आधीपेक्षा अधिक मजबूत होऊ शकते. गुंतवणुकीतून चांगला नफा मिळण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. या काळात नोकरदार लोकांना करिअरच्या नवीन संधी मिळू शकतात. तुमचे रखडलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. या काळात तुमच्या मेहनतीला अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे.

(हे ही वाचा: ४४ दिवसांनी ‘या’ राशीच्या व्यक्तींचा होणार भाग्योदय, आयुष्यात येणार आनंदाचे क्षण? देवगुरुच्या कृपेने मिळू शकतो पैसा, प्रेम अन् प्रसिद्धी)

तूळ राशी (Libra Zodiac)

मालव्य राजयोग बनल्याने तूळ राशीच्या लोकांना चांगले परिणाम मिळण्याची शक्यता आहे. यावेळी तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळू शकते. व्यावसायिकांसाठी हा काळ चांगला ठरु शकतो. व्यवसायाचा विस्तार होऊ शकतो. नोकरी करणाऱ्या लोकांना नवीन संधी मिळू शकतात. या काळात प्रचंड धनलाभ होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊन आर्थिक स्थिती सुधारु शकते. प्रलंबित असलेली कामे पुन्हा मार्गी लागू शकतात. अविवाहितांना विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात.

धनु राशी (Sagittarius Zodiac)

मालव्य राजयोग बनल्याने धनु राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. अडकलेले पैसे परत मिळण्याची दाट शक्यता आहे. पैशाची आवक वाढू शकते. या काळात आर्थिक क्षेत्रात यश मिळण्याची शक्यता आहे. तुम्हाला मालमत्ता खरेदी आणि विक्रीवर नफा देखील मिळू शकतो. यावेळी तुम्हाला तुमच्या मुलाशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडू शकतात. यावेळी तुम्हाला न्यायालयीन खटल्यांमध्ये विजय मिळू शकतो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल ठरु शकतो.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)