Shukra Guru Kendra Yog 2025 : केंद्र दृष्टी योग तेव्हा निर्माण होतो जेव्हा दोन ग्रह एक दुसर्यापासून ९० अंशावर विराजमान असतात. तर सोमवारी ३ नोव्हेंबर २०२५ रोजी पहाटे ४ वाजून ४४ वाजता ब्रह्म मुहूर्तावर, शुक्र आणि गुरू एकमेकांपासून ९० अंशावर विराजमान असतील, ज्यामुळे ‘केंद्र दृष्टी योग’ निर्माण होईल. शुक्र आणि गुरूच्या केंद्र दृष्टी योगाचा फायदा तीन राशींच्या लोकांना होणार आहे. त्यामुळे या तीन राशी कोणत्या याबद्दल जाणून घेऊयात…
शुक्राच्या प्रभावाखाली भाग्यवान राशींच्या लोकांना प्रेम, संपत्ती, सौभाग्य व भौतिक सुखसोई मिळतील. दरम्यान, गुरूच्या प्रभावामुळे ज्ञान आणि अध्यात्माकडे त्यांचा कल वाढू शकतो.
वृषभ (Taurus Zodiac Sign) – शुक्र आणि गुरूच्या युतीमुळे वृषभ राशीच्या लोकांसाठी हा शुभ काळ असू शकतो. नशीब त्यांच्या बाजूने निर्णय घेईल आणि त्यांच्या जीवनात आनंद वाढेल. संपत्तीबरोबरच जीवनाबद्दलची तुमची समजही वाढेल. कला, सौंदर्यात रस वाढेल आणि प्रेमसंबंध सुधारतील. आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी संधींचा फायदा घ्याल आणि प्रलंबित कामे पूर्ण होण्याच्या मार्गावर येतील.
तूळ (Libra Zodiac Sign) – केंद्र दृष्टी योग तूळ राशीच्या लोकांसाठी अत्यंत शुभ ठरू शकतो. त्यामुळे विवाहाची शक्यता निर्माण होऊ शकते आणि तुमच्या नात्यांमधील प्रेम फुलू शकते. कलेचे आकर्षण वाढेल. सुविधा वाढतील. आर्थिक लाभाचे अनेक मार्ग खुले होतील. विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता वाढू शकते. शुक्राच्या प्रभावामुळे प्रेम वाढेल. जुने नातेसंबंध अचानक दृढ होतील.
मीन (Pisces Zodiac Sign) – मीन राशीच्या लोकांसाठी केंद्र दृष्टी योग सकारात्मक परिणाम देतील. ज्ञान वाढेल, पैसे कमवण्याचे अनेक मार्ग समोर येतील. प्रवासाचा योग, व्यवसायात नफा होण्याची शक्यता आहे. करिअरमध्ये प्रगती होईल. नोकरी करणाऱ्यांना अधिक पैसे कमवता येतील. जीवनाच्या नवीन दिशा शोधण्यासाठी हा चांगला काळ ठरणार आहे.
