आजपासून २३ दिवसांसाठी शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. शुक्राच्या आगमनामुळे मंगळ आणि शुक्र एकत्र राहणार आहेत. शिवाय शुक्र २३ दिवस याच राशीत राहणार आहे. शुक्राने राशी बदल केल्यामुळे तुळ ते मीन या राशींवर अनेक परिणाम दिसून येणार आहेत. या राशींच्या लोकांच्या नशिबात येणारे २३ दिवस काय बदल घडवू शकतात ते जाणून घेऊया.

तूळ –

तुळ राशीच्या लोकांसाठी शुक्र हा लग्न आणि आठव्या स्थानाचा कारक आहे. लग्नाचा कारक असल्याने तो नेहमीच शुभ परिणाम देतो. सिंह राशीत गोचर केल्यानंतर शुक्र लाभाच्या स्थानी राहणार आहे, त्यामुळे आर्थिक कार्यात सकारात्मक बदल घडू शकतात. तसेच सकारात्मक विचारांत वाढ होऊ शकते. यासोबतच व्यवसायातही सकारात्मक बदल घडू शकतात. या दिवसांत वैवाहिक जीवनातील सकारात्मक बदलांसह आर्थिक प्रगतीचीही शक्यता आहे. तर शिक्षण क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल ठरु शकतो.

वृश्चिक –

वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुक्र सातव्या आणि व्यय स्थानाचा कारक असल्यामुळे फारसे शुभ परिणाम देण्याची शक्यता कमी आहे. तरीही शुक्र दहाव्या स्थानी गोचर करत आहेत, ज्यामुळे घर आणि वाहनाच्या सुखात वाढ होऊ शकते. वैवाहिक सुख आणि प्रेमसंबंधांमध्ये सकारात्मक प्रगती होऊ शकते. कला क्षेत्राशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल राहील. दूरच्या प्रवासासाठी खर्च होण्याची दाट शक्यता आहे.

धनु –

धनु राशीच्या लोकांसाठी शुक्र हा सहाव्या आणि लाभ स्थानाचा कारक असल्यामुळे फारसे शुभ परिणाम न मिळण्याची शक्यता आहे. तरीही तो लाभेश होऊन भाग्यस्थानात प्रवेश करणार आहे, ज्यामुळे लाभ होऊ शकतो. या काळात तुमच्या व्यवसायाचा विस्तार वाढू शकतो. नोकरी व्यवसायात बदल होऊ शकतो. तुम्हाला कामामध्ये नशिबाची साथ मिळू शकते. तसेच अगदी जवळच्या व्यक्तीकडून तणावाची परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. प्रेम संबंधांमध्ये गोडवा राहू शकतो.

मकर –

मकर लग्न आणि राशी असलेल्या लोकांसाठी शुक्र दहाव्या आणि पाचव्या स्थानाचा कारक असल्याने ते अंतिम राजयोग कारक आहेत. ज्यामुळे तुम्हाला केवळ शुभ परिणाम मिळू शकतात, शुक्र सिंह राशीच्या आठव्या स्थानी गोचर करत आहे, ज्यामुळे कौटुंबिक कार्यात वाढ होऊ शकतो. मात्र पोट आणि पायांचा त्रास वाढू शकतो. तसेच कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. शिक्षणाशी संबंधित लोकांसाठी हा काळ अनुकूल राहू शकतो.

हेही वाचा- गुरु भरणी नक्षत्रात प्रवेश करताच ‘या’ ५ राशींचे नशीब पालटणार? व्यवसायात प्रगतीसह बक्कळ धनलाभ होण्याची शक्यता

कुंभ –

कुंभ राशीसाठी शुक्र हा भाग्याचा आणि सुखाचा कारक असल्यामुळे तो सर्वात शुभ परिणाम देऊ शकतो. सिंह राशीत शुक्र गोचर करताच तुम्हाला अनेक शुभ परिणाम देऊ शकतो. त्यामुळे या काळात भागीदारीच्या कामांमध्ये वाढ होऊ शकते. तुमच्या कामांमध्ये तुम्हाला नशीबाची साथ मिळण्याची दाट शक्यता आहे. वडिलांचा सहवास लाभू शकतो. तुमच्या कार्यक्षेत्रात बदल होऊ शकतो. सुखाच्या साधनांमध्ये वाढ होऊ शकते.

मीन –

मीन राशीच्या लोकांसाठी शुक्र ग्रह पराक्रम आणि आठव्या स्थानी कारक झाल्यामुळे तो शुभ फल देण्याची शक्यता कमी आहे. सिंह राशीत गोचर करताना शुक्र रोग आणि शत्रूंमध्ये गोचर करेल. ज्यामुळे तुमचे अंतर्गत रोग आणि शत्रू वाढण्याची शक्यता आहे. तुमच्या जवळचा मित्र तणावाची परिस्थिती निर्माण करू शकतो. त्वचेच्या ऍलर्जीची समस्या देखील उत्पन्न होऊ शकतात. प्रवास खर्चात वाढ होण्याची शक्यता आहे.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)