Venus Transit 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र सध्या मीन राशीत विराजमान असून तो तब्बल ३६५ दिवसानंतर म्हणजेच १९ मार्च रोजी मीन राशीमध्ये अस्त होणार आहे. तसेच ४ दिवस अस्त झाल्यानंतर २३ मार्च रोजी सकाळी ५ वाजून ४९ मिनिटांनंतर तो उदित अवस्थेत येईल. शुक्राच्या मीन राशीतील उदित होण्याने काही राशींच्या व्यक्तींना शुभ परिणाम पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘या’ तीन राशीच्या व्यक्तींना मिळणार प्रत्येक कामात यश

धनु

धनु राशीच्या व्यक्तींना शुक्राची उदित अवस्था खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या प्रत्येक कामात यश मिळेल. या राशीच्या चौथ्या भावात शुक्राचा उदय होईल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. या राशीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक स्पर्धेत यश मिळेल. अचानक धनलाभ संभवतो. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खूश असतील. या काळात तुम्हाला प्रत्येक कामात हवे तसे यश मिळेल. आयुष्यात मानसन्मान आणि कामाच्या ठिकाणी तुमचे वर्चस्व वाढेल. आई-वडिलांची साथ मिळेल.

मकर

मकर राशीच्या व्यक्तींनाही शुक्राची उदित अवस्था खूप फायदेशीर ठरेल. या राशीच्या तिसऱ्या भावात शुक्राचा उदय होईल. या काळात तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल. शुक्राच्या कृपेने आरोग्य चांगले राहिल.

कुंभ

कुंभ राशीच्या व्यक्तींनाही शुक्राची उदित अवस्था खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मान-सन्मानात वाढ होईल. तुमच्या भौतिक सुखात वाढ होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. आयुष्यात सकारात्म बदल होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shukra udya in pisces these three zodic sign will get love material happiness with promotion sap