Hybrid Solar Eclipse: ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाचे वेगवेगळे पैलू आपल्याला पाहायला मिळतात. या वर्षातील पहिले सूर्यग्रहण २० एप्रिल २०२३ रोजी आहे. यावेळी ते सामान्य नसून अनेक अर्थाने खास असेल. सोप्या भाषेत सांगायचं तर, जेव्हा चंद्र सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येतो आणि तिघेही एका सरळ रेषेत असतात, त्यावेळी सूर्यग्रहण दिसतं. पण, यावेळच्या सूर्यग्रहणाला ‘हायब्रीड सूर्यग्रहण’ असं म्हटलं जात आहे. तसेच पंचांगानुसार अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या वैशाख अमावस्येच्या दिवशी हे सूर्यग्रहण आहे. चला सविस्तर जाणून घेऊया हे हायब्रीड सूर्यग्रहण म्हणजे नेमकं काय?

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हायब्रीड सूर्यग्रहण म्हणजे काय ?

हायब्रीड सूर्यग्रहणाला निंगालू सूर्यग्रहण किंवा शंकर सूर्यग्रहण असेही म्हणतात. हे सूर्यग्रहण विशेष खास असणार आहे, कारण आंशिक, संपूर्ण आणि कंकणाकृती अशा तीनही स्वरूपांत हे सूर्यग्रहण दिसणार आहे. अशी घटना सुमारे १०० वर्षांत एकदाच पाहायला मिळते. अशा स्थितीत चंद्राचं पृथ्वीपासूनचं अंतर ना जास्त असत, ना कमी. हायब्रीड सूर्यग्रहण हे सकाळी ७.४ पासून सुरू होईल आणि ५ तास २४ मिनिटांपर्यंत असेल. तर त्यानंतर दुपारी १२:२९ वाजता संपेल.

हेही वाचा – Surya Grahan 2023 : २० एप्रिलला दिसणार वर्षातलं पहिलं सूर्यग्रहण, जाणून घ्या वेळ, तिथी, सुतक काळ, कोणत्या राशींवर होईल प्रभाव?

सूर्यग्रहणाचे प्रकार किती आहेत?

आंशिक सूर्यग्रहण –

जेव्हा चंद्र सूर्याच्या एका छोट्या भागासमोर येतो आणि त्याला रोखतो तेव्हा त्याला आंशिक सूर्यग्रहण म्हणतात.

कंकणाकृती सूर्यग्रहण –

जेव्हा चंद्र सूर्याच्या अगदी मध्यभागी येतो आणि त्याचा प्रकाश रोखतो तेव्हा सूर्याभोवती प्रकाशाचे एक तेजस्वी वर्तुळ तयार होते. याला ‘रिंग ऑफ फायर’ म्हणतात.

संपूर्ण सूर्यग्रहण –

जेव्हा पृथ्वी, सूर्य आणि चंद्र एका सरळ रेषेत असतात तेव्हा पृथ्वीचा एक भाग पूर्णपणे गडद होतो आणि अशा स्थितीत संपूर्ण सूर्यग्रहण होते. संपूर्ण सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्याने डोळ्यांना इजा होऊ शकते.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Solar eclipse 2023 know what is hybrid solar eclipse and its types srk