Budhaditya Rajyog in Mithun: वैदिक ज्योतिषात ग्रहांची विशेष भूमिका आहे. सर्व ग्रह नियमित अंतराने त्यांची चिन्हे बदलतात. ग्रहांच्या राशीच्या बदलाव्यतिरिक्त, सर्व ग्रहांच्या चाली वेळोवेळी बदलत राहतात, ज्याचा प्रत्त्येकाच्या जीवनावर परिणाम होतो. यावेळी बुधदेव मिथुन राशीत विराजमान आहेत. तर आता १५ जूनला सूर्यदेवाने मिथुन राशीत प्रवेश केला आहे. यातच मिथुन राशीत सूर्य आणि बुध यांच्या संयोगाने ‘बुधादित्य राजयोग’ घडून आला आहे. हा शुभ योग ३६५ दिवसांनी मिथुन राशीत घडून आला आहे. बुधादित्य राजयोग अत्यंत शुभ मानला जातो. ज्योतिष शास्त्रानुसार, जेव्हाही राशींमध्ये बुधादित्य राजयोग तयार होतो तेव्हा लोकांचे भाग्य खुलते, असं मानले जाते. या राजयोगाचा काही राशींना फायदा होऊ शकतो. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

‘या’ राशी होऊ शकतात मालामाल?

वृषभ राशी

वृषभ राशीच्या लोकांसाठी बुधादित्य राजयोग खूप फायदेशीर ठरू शकतो. या लोकांना मोठा आर्थिक फायदा होऊ शकतो. कुठूनतरी अचानक पैसे मिळण्यासोबतच उत्पन्न वाढण्याचीही शक्यता आहे. या राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. लोकांच्या सुख-सुविधांमध्येही वाढ होऊ शकते. व्यावसायिकांना काही विशेष काम पूर्ण करून फायदा होऊ शकतो. मुलांशी संबंधित काही चांगली बातमी मिळू शकते. मीडिया, कम्युनिकेशन आणि मार्केटिंग क्षेत्राशी संबंधित लोकांनाही फायदा होऊ शकतो.  जे नोकरी शोधत आहेत त्यांना नोकरीच्या ऑफर मिळू शकतात.

(हे ही वाचा : १८ जूनपासून ‘या’ ४ राशी होतील आनंदी? शुक्रदेवाच्या नक्षत्र परिवर्तनाने श्रीमंत होण्याची संधी चालत येऊ शकते तुमच्या दारी )

मिथुन राशी

बुधादित्य राजयोग मिथुन राशीच्या लोकांनाही अनुकूल परिणाम देऊ शकतो. या लोकांचे उत्पन्न वाढण्याची दाट शक्यता आहे. तुमचा बँक बॅलन्स वाढू शकतो. पैशांची बचत करण्यातही तुम्ही यशस्वी होऊ शकाल. या राशीच्या लोकांना उत्पन्न वाढवण्यासाठी काही नवीन मार्ग सापडू शकतात. नोकरदार लोकांसाठी पदोन्नती आणि वेतनवाढीची शक्यता आहे. विवाहित लोकांचे वैवाहिक जीवन चांगले राहू शकते. या कालावधीत तुम्ही देश-विदेशात प्रवास करू शकता. 

सिंह राशी

बुधादित्य राजयोग सिंह राशीच्या लोकांना खूप लाभ देऊ शकतो. नोकरीत बढती होण्याची शक्यता आहे. व्यवसायात लाभ होऊ शकतो. प्रगतीचे नवे मार्ग खुले होऊ शकतात. कामाच्या ठिकाणी अधिकारी आणि कर्मचारी तुम्हाला सहकार्य करु शकतात. या राशीच्या लोकांना शैक्षणिक क्षेत्रात खूप फायदा होऊ शकतो. या काळात प्रत्येक कामात यश मिळू शकतो. या काळात विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळू शकते. वडिलांसोबत तुमचे संबंध चांगले राहू शकतात.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)