Sun Shani and Shukra Grah Yuti: ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांच्या मार्गक्रमणामुळे मार्च महिना खूप खास असणार आहे. मार्चमध्ये अनेक मोठे ग्रह राशी बदलणार आहेत. राशी परिवर्तनासह या महिन्यात काही ग्रहांची युती देखील होणार आहे. शुक्र ग्रह ७ मार्चला कुंभ राशीत प्रवेश करणार आहे, जिथे सूर्य आणि शनि ग्रह आधीपासून विराजमान आहे. ज्यामुळे कुंभ राशीत शुक्र, सूर्य आणि शनिदेवाच्या युतीने ‘त्रिग्रही योग’ निर्माण होणार आहे. तीन ग्रह एकाच राशीत असताना त्रिग्रही योग तयार होतो. हा योग तब्बल ३० वर्षांनी कुंभ राशीत घडणार आहे. कुंभ राशीमध्ये तयार होणाऱ्या त्रिग्रही योगामुळे कोणत्या राशींच्या व्यक्तींना फायदा होऊ शकतो, जाणून घेऊयात…

‘या’ राशीच्या लोकांना होणार बंपर धनलाभ?

वृषभ राशी

त्रिग्रही योग बनल्याने वृषभ राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होऊ शकतो. या राशीच्या लोकांना त्यांच्या करिअरमध्ये बरेच फायदे मिळण्याची शक्यता आहे. परदेशात नोकरीची संधी मिळू शकते. वडिलोपार्जित मालमत्ताच्या माध्यमातून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. आर्थिक स्थितीही मजबूत होण्याची शक्यता आहे. तुमचे धैर्य, सामर्थ्य आणि आत्मविश्वास देखील वाढण्याची शक्यता आहे.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sun shani and shukra planet conjunctions in kumbh positive impact of these zodiac sing can get huge money pdb
First published on: 27-02-2024 at 16:12 IST