Samsaptak Rajyog: ज्योतिषशास्त्रानुसार वेळोवेळी ग्रहांचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन पाहायला मिळते. त्यांचा सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींवर होतो. सध्या सूर्यदेव मिथुन राशीत विराजमान असून या राशीत गुरूच्या उपस्थितीमुळे गुरू-आदित्य राजयोग निर्माण झाला आहे. तसेच दुसरीकडे चंद्र अडीच दिवसांमध्ये एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो. ज्यामुळे कोणत्याना कोणत्यातरी ग्रहाबरोबर त्याची युती निर्माण होते. नुसताच चंद्र धनु राशीत प्रवेश करत असून सूर्याबरोबर चंद्राचा समसप्तक राजयोग निर्माण होईल. हा योग काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी ठरेल.

पंचांगानुसार, चंद्र ९ जुलै रोजी सकाळी ३ वाजून १४ मिनिटांनी धनु राशीत प्रवेश करणार असून तो ११ जुलैपर्यंत याच राशीत राहणार आहे. त्यामुळे जवळपास ५४ तास हा योग असेल. ज्याचा काही राशीच्या व्यक्तींना विशेष लाभ होईल. दरम्यान, जेव्हा दोन ग्रह एकमेकांपासून सातव्या भावात विराजमान असतात तेव्हा समसप्तक राजयोग निर्माण होतो.

या तीन राशींची होणार चांदी

कर्क (Kark Rashi)

समसप्तक योग कर्क राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. नव्या नोकरीची संधी मिळेल. मुलांकडून आनंदी वार्ता कानी पडतील. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी पार पाडावी लागेल. वैवाहिक जीवनात गोडी निर्माण होईल. उत्पन्नाचे नवे स्रोत मिळेल. प्रवास घडतील आणि आरोग्यही चांगले राहील. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल.

कन्या (Kanya Rashi)

समसप्तक योग कन्या राशींच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या काळात तुम्हाला भाग्याची पुरेपुर साथ मिळेल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. वैवाहिक जीवनातील गैरसमज दूर होतील. धार्मिक कार्यात आवडीने सहभागी व्हाल. दूरचे प्रवास घडण्याची शक्यता आहे. नवीन छंद आत्मसात करण्याचा प्रयत्न कराल. कुटुंबात आनंदी आनंद असेल. या काळात घरामध्ये शुभकार्ये पार पडतील.

धनु (Kanya Rashi)

समसप्तक योग धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी सिद्ध होईल. या काळात तुम्हाला समाजात मान-सन्मान प्राप्त होईल. पगारवाढ होण्याची दाट शक्यता आहे. अविवाहित व्यक्तींना लग्नाचे प्रस्ताव येतील. या काळात भौतिक सुखाची प्राप्ती होईल. नवीन गाडी, मोबाईल विकत घेऊ शकता. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)