Sun Transit 2024: वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह एका ठराविक वेळेनंतर एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये गोचर करतात. सूर्याला एका राशीतून दुसऱ्या राशीत जाण्यासाठी एका महिन्याचा वेळ लागतो. सूर्य सध्या कुंभ राशीमध्ये आहे. मार्चमध्ये सूर्य गुरूची राशी मीनमध्ये प्रवेश करणार आहे.
ज्योतिषशास्त्रानुसार गुरू आणि सूर्य मित्र आहेत. अशात काही राशींना गुरूचे शुभ परिणाम दिसून येईल. तीन राशीसाठी हा काळ उत्तम राहणार आहे. या काळात या तीन राशींचे नशीब बदलू शकते. त्यांना अचानक धनलाभ होऊ शकतो. तुम्हाला माहिती आहे का त्या तीन राशी कोणत्या आहेत? आज आपण जाणून घेऊ या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मीन

मीन राशीच्या लोकांना सूर्याचे गोचर खूप जास्त फायद्याचे ठरू शकतात. या वेळी या लोकांचे नशीब चमकू शकते. या लोकांचा अचानक आत्मविश्वास वाढेन ज्यामुळे जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रात त्यांचे प्रगतीचे योग दिसून येईन. जर हे लोकं पार्टनरशिपमध्ये काम करत असेल तर यांना आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. जोडीदाराबरोबर या लोकांचे नातेसंबंध दृढ होईल. अविवाहित लोकांसाठी विवाहाचे योग जुळून येईल.

हेही वाचा : Aquarius Compatibility: कुंभ राशीचे ‘या’ तीन राशींबरोबर अजिबात पटत नाही, या लोकांपासून राहा दूर

धनु

सूर्याचे मीन राशीमध्ये गोचर या राशीसाठी फायद्याचे ठरणार आहे. सूर्य देव धनु राशीच्या चौथ्या स्थानावर मार्गक्रमण करत आहे. यामुळे या लोकांना सुख समृद्धी लाभेल. वाहन किंवा प्रॉपर्टी खरेदी करण्याचे योग जुळून येईल. या लोकांचा मानसन्मान आणि प्रतिष्ठा वाढेल. सू्र्याने मीन राशीमध्ये प्रवेश केल्यामुळे धनु राशीच्या लोकांना मानसिक शांतता आणि प्रसन्नता लाभेल तसेच त्यांच्या सकारात्मक विचारांमध्ये वृद्धी होईल. नोकरीच्या ठिकाणी यश मिळेल.

कर्क राशी

सूर्य गोचर कर्क राशीसाठी शुभ फळ देणारा असेल. सूर्य देव कर्क राशीमध्ये नवव्या स्थानावर असेल. अशात या राशींचे भाग्य चमकू शकते. या लोकांच्या कामातील अडथळे दूर होतील आणि थांबलेले काम पुन्हा सुरू होईल. या लोकांचे आरोग्य उत्तम राहील. यांना धनप्राप्तीचे अनेक मार्ग दिसून येईल. या दरम्यान सूर्याच्या प्रभावामुळे प्रवासाचे योग जुळून येईल.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya gochar 2024 sun will transit in pisces rashi these zodiac signs will get money astrology know more about sun transit 2024 ndj