Surya-Guru Make Shatank Yog: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक ग्रहाचे ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन किंवा नक्षत्र परिवर्तन होते. ज्याचा शुभ प्रभाव मानवी जीवनावर पाहायला मिळतो. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मविश्वास, पद-प्रतिष्ठेचा कारक ग्रह म्हटले जाते. तर, गुरू ग्रहाला सुख, समृद्धीचा कारक ग्रह म्हणून ओळखले जाते. २८ ऑक्टोबर २०२५ रोजी सूर्य-गुरू एकमेकांपासून १२० डिग्रीवर असतील. ज्यामुळे शतांक योग निर्माण होईल. हा राजयोग काही राशीच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी ठरेल.
शतांक योग ‘या’ तीन राशींचे भाग्य उजळणार
सिंह
सिंह राशीच्या व्यक्तींसाठी हा योग खूप लाभकारी सिद्ध होईल. या काळात तुमच्या सर्व इच्छा-आकांक्षा पूर्ण होतील. मानसिक तणावातून दूर व्हाल. आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. स्पर्धा परिक्षेत हवे तसे यश मिळवता येईल. आत्मविश्वास वाढेल आणि प्रत्येक कामात भरपूर यश मिळेल. अचानक धनलाभ होईल व समाजात मान-सन्मान देखील प्राप्त होईल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे.
वृश्चिक
वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शतांक योग खूप अनुकूल असेल. या काळात यशाचे नवे दरवाजे उघडतील. व्यवसायात भरपूर यश मिळेल. दांपत्य जीवन सुखमय राहील. मेहनतीचे योग्य फळ मिळवाल. वरिष्ठांकडून कामाचे कौतुक होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आरोग्य चांगले राहील. पैशांची बचत कराल. गुंतवणूक केल्यास फायदा होईल. मान-सन्मान वाढेल.
मीन
हा शुभ राजयोग मीन राशीच्या व्यक्तींना लाभदायी सिद्ध होईल. मनातील सर्व इच्छा, आकांक्षा पूर्ण होण्याची दाट शक्यता आहे. या काळात तुमच्यावर खूप सकारात्मक परिणाम झाल्याचे पाहायला मिळेल. या काळात भौतिक सुखात वाढ होण्याची शक्यता आहे. जमीन खरेदी करू शकता. मुलांकडून आनंदी वार्ता येतील. मनातील सर्व इच्छा सहज पूर्ण होतील. मेहनतीचे फळ मिळेल आणि विद्यार्थ्यांनाही हवे तसे यश मिळेल. त्याशिवाय शिक्षणात प्रगती होईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)
