Shadashtak Yog: ज्योतिषशास्त्रामध्ये प्रत्येक ग्रहाचे राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते. ग्रहांचे राशी परिवर्तन अनेकदा शुभ योग किंवा राजयोग निर्माण करतात, ज्याचा प्रभाव मानवी जीवनावर विविध प्रकारे पाहायला मिळतो. पंचांगानुसार, ७ फेब्रुवारी रोजी सूर्य आणि मंगळ ग्रहाची युती षडाष्टक योग निर्माण करत आहेत. या योगाच्या प्रभावाने काही राशींच्या व्यक्तींचे भाग्य चमकेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘षडाष्टक योग’ देणार प्रत्येक कामात यश

मेष

मेष राशीच्या व्यक्तींना या योगाच्या प्रभावाने या काळात तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल. आयुष्यात आनंदी आनंद येईल. या काळात अनेकदा मेष राशीच्या व्यक्तींना आकस्मिक धनलाभ होईल. करिअरमध्ये चांगले बदल पाहायला मिळतील. अडकलेले पैसे परत मिळतील. नव्या नोकरीची ऑफर मिळेल. कामाच्या ठिकाणी दिले गेलेले लक्ष्य पूर्ण कराल. गुंतवणूकीतून चांगला फायदा होईल. व्यवसायात चांगला परिणाम पाहायला मिळेल. आरोग्य चांगले राहील.

सिंह

सिंह राशीच्या व्यक्तींना या काळात तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील. व्यवसायात आकस्मिक धनलाभ होतील. दूरचे प्रवास घडतील. तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना हवे तसे यश मिळेल. या काळात प्रमोशन होईल. आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होईल. आपल्या जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या. वैवाहिक जीवनात प्रेम वाढेल. समाजात मान-सन्मान प्राप्त होईल.

धनु

षडाष्टक योग धनु राशीच्या व्यक्तींसाठी खूप लाभदायी ठरेल. या काळात भाग्याची पुरेपूर साथ मिळेल. नवे वाहन, घर, जमीन खरेदी करू शकता. सगळीकडे तुमचे वर्चस्व असेल. कुटुंबातील वाद मिटतील. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल. व्यवसाय करणाऱ्यांना धनलाभ होईल. पद-प्रतिष्ठा वाढेल.

(टीप : वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Surya mangal yuti 25 create shadashtak yog thress zodic sign earn lots of money sap