Surya Nakshatra Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार सर्व नवग्रह राशींप्रमाणे नक्षत्र परिवर्तन करत असतात. राशीनुसार ग्रहांचे नक्षत्रात होणारे गोचरही मानवी जीवनावर प्रभाव करणारे ठरत असते. एखाद्या व्यक्तीचा कोणत्या नक्षत्रावर जन्म झाला आहे, त्यावरूनही काही गोष्टींचा अंदाज बांधला जाऊ शकतो. वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार नवग्रहांचा राजा मानला गेलेला सूर्य नक्षत्र गोचर करत आहे. वैदिक पंचांगानुसार, २७ सप्टेंबर २०२५ रोजी सूर्य उत्तराफाल्गुनी नक्षत्रातून निघून हस्त नक्षत्रात प्रवेश करणार आहे, ज्याचा प्रभाव काही राशींवर विशेष राहणार आहे. हस्त नक्षत्राचे स्वामी चंद्र आहेत. ज्योतिषशास्त्रात सूर्याला आत्मा आणि पित्याचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत सूर्य मजबूत असतो, त्या व्यक्तीला आयुष्यात भरपूर यश, सुख, पद-प्रतिष्ठा, मान-सन्मान प्राप्त होतो. सूर्याचे हे नक्षत्र परिवर्तन काही राशींच्या व्यक्तींसाठी अत्यंत लाभदायी असेल. चला तर पाहूयात कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…

४ दिवसांमध्ये नशीब बदलणार! सूर्यदेवाच्या कृपेने बक्कळ पैसा मिळण्याची शक्यता

मेष

मेष राशीसाठी सूर्य नक्षत्र परिवर्तन नवीन ऊर्जा घेऊन येईल. ऑफिसमध्ये तुमची मेहनत लक्षात येईल आणि प्रमोशन किंवा पगार वाढीची संधी मिळू शकेल. जर तुम्ही एखाद्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर ही वेळ यशस्वी ठरण्याची आहे. घरात आणि कुटुंबात तुमचा सन्मान वाढेल, तसेच घरच्या वृद्धांचे आशीर्वाद मिळतील.

तूळ

तूळ राशीसाठी हा बदल आर्थिक स्थिरता घेऊन येणार आहे. अडकलेल्या पैशांच्या गोष्टी आता मार्गी लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संधी आणि व्यावसायिकांसाठी लाभाची वेळ आहे. कौटुंबिक जीवनात सामंजस्य राहील आणि नातेसंबंधांमध्ये गोडवा वाढेल. जुने वाद संपण्याची शक्यता आहे.

वृश्चिक

वृश्चिक राशीधारकांना या काळात प्रत्येक क्षेत्रात प्रगती दिसून येऊ शकते. कामातील मेहनत फळाला येईल आणि नवीन उंची गाठण्याची संधी मिळू शकेल. व्यवसाय करत असाल तर मोठ्या डील्स व आर्थिक फायदा मिळू शकतो. नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचे सहकार्य मिळेल आणि समाजात सन्मान वाढू शकतो. घरात धार्मिक किंवा शुभ कार्य पार पडण्याची शक्यता आहे.

मीन

मीन राशीसाठी सूर्य नक्षत्र परिवर्तन भाग्यवान ठरणार आहे. दीर्घकाळ अडकलेली कामं आता पूर्ण होतील. नोकरीत नवीन जबाबदाऱ्या येतील, ज्यामुळे प्रमोशनची शक्यता वाढेल. विदेशात जाण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा अत्यंत शुभ काळ आहे. उच्च शिक्षण किंवा संशोधनाशी संबंधित विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. घरात शुभ वार्ता मिळण्याची संधी आहे.

सूर्य हस्त नक्षत्रात प्रवेश करताच काही राशींना यश, आर्थिक समृद्धी, कौटुंबिक सुसंवाद आणि भाग्यवान घडामोडी अनुभवायला मिळतील. ज्योतिषशास्त्रानुसार या काळात छोटे निर्णय मोठे फायदे देऊ शकतात.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. त्याच्या तथ्यांबद्दल लोकसत्ता कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोराही देत नाही.)