Surya Rashi Parivartan 2025: ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक ग्रह त्याच्या विशिष्ट वेळी गोचर करतो आणि सर्व राशींच्या जीवनावर परिणाम करतो. ज्योतिषशास्त्रात सूर्य हा ग्रहांचा राजा मानला जातो. सूर्य देव सुमारे एक महिन्यानंतर राशिबदल करतो. त्यामुळे सूर्य देवाचे संक्रमण विशेष मानले जाते. सूर्याच्या गोचरचा प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम होतो. आता ग्रहांचा राजा सूर्य ऑगस्टमध्ये आपल्या स्वतःच्या सिंह राशीत प्रवेश करणार आहे. त्याचा प्रभाव सर्व राशींच्या लोकांवर दिसून येईल. परंतु ,अशा तीन राशी आहेत, ज्यांचे नशीब यावेळी चमकू शकते. काही राशींच्या लोकांच्या सुख-समृद्धीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. पाहू कोणत्या आहेत त्या भाग्यशाली राशी…

सूर्यदेवाच गोचर! ‘या’ राशींना होणार मोठा आर्थिक लाभ

सिंह

सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे सिंह राशीच्या लोकांना मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या संपत्तीत वाढ होण्याचीही शक्यता आहे. कामाच्या ठिकाणीही तुमच्या कामाचे कौतुक होऊ शकते. यावेळी तुमचा आत्मविश्वास वाढू शकतो. नशिबाने पूर्ण साथ दिल्याने गुंतवणूक फायदेशीर ठरू शकते. तुम्ही या काळात पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. या काळात प्रगतीच्या नव्या संधी तुम्हाला मिळू शकतात. नोकरी आणि व्यवसायात चांगली प्रगती होण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे तुम्हाला या काळात परत मिळू शकतात. वडिलोपार्जित संपत्तीचा लाभ मिळू शकतो.

वृश्चिक

सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे वृश्चिक राशीच्या लोकांना शुभ परिणाम मिळू शकतात. तुमचे नशीब उघडण्याची शक्यता आहे. या काळात या राशीतील लोकांना व्यवसायात फायदा होण्याची शक्यता आहे. तुम्ही पैशाची बचत करण्यात यशस्वी होऊ शकता. तुमची आर्थिक स्थिती मजबूत होऊ शकते. तुम्ही देश-विदेशात पर्यटनासाठी जाऊ शकता. व्यवसाय परदेशाशी संबंधित असेल, तर तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. कुटुंबात सुख-शांती नांदण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवन सुखकर होण्याची शक्यता आहे. समाजात मान-प्रतिष्ठेच्या मागणीत वाढ होऊ शकते.

धनू

सूर्याच्या राशी परिवर्तनामुळे धनू राशीच्या लोकांच्या सर्व मनोकामना पूर्ण होऊ शकतात. नोकरदार लोकांना करिअरच्या दृष्टीने अनेक सुवर्णसंधी मिळू शकतात. उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होऊ शकतात. या काळात तुम्हाला व्यवसायात भरपूर आर्थिक लाभ मिळू शकतात. काही प्रकरणांमध्ये तुम्हाला अनपेक्षित नफा मिळण्याची अपेक्षा आहे. वैवाहिक जीवनात सुख-समृद्धी लाभण्याची शक्यता आहे. या काळात प्रेमसंबंधांमध्ये गोडवा वाढू शकतो. गुंतवणुकीचा विचार करीत असाल, तर हा काळ खूप शुभ परिणाम देणारा ठरू शकतो. तुम्हाला भागीदारीच्या कामातही यश मिळण्याची शक्यता आहे. सन्मानासह तुमची प्रतिष्ठादेखील वाढण्याची शक्यता आहे.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)