Surya Shani Kendra Yog 2025 : वैदिक पंचागनुसार, २३ जून दुपारी १ वाजून ५७ मिनिटांनी सूर्य शनि एक दुसऱ्याच्या ९० डिग्रीवर असणार. ज्यामुळे केंद्र योग निर्माण होईल. शनि सूर्याला ज्योतिषशास्त्रामध्ये पिता पुत्राचा संबंध सांगितला आहे.
तीन राशीच्या लोकांना लाभ
केंद्र योग निर्माण झाल्याने काही राशीच्या लोकांचे नशीब उजळणार आहे. अडकलेले काम पूर्ण होईल. धन संपत्तीमध्ये वृद्धी होऊ शकते. व्यक्तीच्या पद प्रतिष्ठेमध्ये वाढ होऊ शकते. जाणून घेऊ या, त्या कोणत्या तीन राशी आहेत.
मेष राशी (Aries Zodiac)
मेष राशीच्या लोकांसाठी शनि सूर्याचा केंद्र योग शुभ परिणाम प्राप्त करणारा असेल. त्यांचा मान सन्मान वाढणार. धन संपत्तीमध्ये वृद्धी होईल. विदेशात प्रवास करण्याचे योग जुळून येईल. अचानक खर्च वाढणार पण पैसा कमावण्याचे अनेक नवीन स्त्रोत उघडतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण दिसून येईल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. व्यवसायात मोठा नफा मिळेल. अडकलेले धन प्राप्त करण्यात व्यक्तीला यश येईल. तसेच आरोग्य सुधारू शकते. या राशींचे नशीब बदलू शकते.
कर्क राशी (Cancer Zodiac)
कर्क राशीच्या लोकांसाठी सूर्य शनिचा केंद्र दृष्टी योग शुभ परिणाम देणारा ठरू शकतो. या लोकांना नशीबाची चांगली साथ मिळेन. कामात येणाऱ्या अडचणी दूर होईल. व्यवसायात लाभ होऊ शकतो. या लोकांना प्रवासाचे योग जुळून येईल. जीवनात सुख समृद्धी नांदेल. अचानक धन प्राप्तीचे मार्ग दिसू शकतात. व्यक्तीच्या आरोग्यामध्ये सुधारणा होऊ शकते. गुंतवणूकीत चांगला लाभ मिळू शकतो. या लोकांना प्रत्येक क्षेत्रात यश मिळू शकते.
मकर राशी (Capricorn Zodiac)
मकर राशीच्या लोकांसाठी सूर्य शनिचा केंद्र योग अति लाभदायक ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी लाभ मिळू शकतो आणि अडचणींपासून सुटका मिळू शकते. जीवनात आनंद दिसून येईल. कुटुंबाबरोबर चांगला वेळ घालवू शकाल. मेहनतीचे फळ मिळेल. व्यक्ती यशस्वी होऊ शकतो. व्यवसायात व्यक्तीला लाभ होऊ शकतो. या लोकांचे आरोग्य उत्तम राहीन. व्यवसाय आणि नोकरी मध्ये लोक प्रगती करतील. यांच्या कामाचे कौतुक केले जाईल.
(टीप: वरील लेख प्राप्त माहितीवर आधारीत आहे)