Weekly Tarot Card Reading 5 to 11 june 2023 in Marathi: वैदिक ज्योतिषशात्रानुसार तुमच्या भविष्याबाबत अंदाज लावण्याचे विविध मार्ग असतात. प्रत्येक व्यक्तीच्या नावाच्या अक्षरावरून, मूळ अंकावरून, जन्मतारखेवरून तसेच कुंडलीवरून त्यांच्या आयुष्यात येणाऱ्या चढ उतारांचे अंदाज वर्तवले जाऊ शकतात. अशीच ज्योतिषशास्त्राची एक शाखा म्हणजे टॅरो कार्ड्स. या टॅरो कार्डनुसार जूनचा दुसरा आठवडा काही राशींसाठी खूप शुभ ठरु शकतो. आठवड्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच ७ जून रोजी बुध गोचर करणार आहे. संपत्ती आणि ऐशोआराम देणारा ग्रह शुक्राच्या वृषभ राशीतील बुधाचे गोचर सर्व राशीच्या लोकांच्या जीवनावर परिणाम करणार आहे. त्यामुळे याचा तुमच्या राशीवर नेमका काय प्रभाव पडू शकतो जाणून घेऊया.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मेष रास –

साप्ताहिक टॅरो कार्डनुसार या आठवड्यात मेष राशींच्या लोकांना व्यवसायात लाभ होऊ शकतो. शिवाय आर्थिक स्थिती देखील चांगली राहू शकते. हा काळ तुम्ही खूप आनंदाने घालवू शकता तर लव्ह लाईफ देखील चांगली राहू शकते.

वृषभ रास –

साप्ताहिक टॅरो कार्डनुसार या आठवड्यात तुमचे वागणे तुम्हाला प्रगती देऊ शकतो. शिवाय या काळात तुम्हाला एखादी मोठी संधी मिळू शकते. तसेच तुमची थांबलेली कामे पुन्हा सुरू होऊ शकतात.

मिथुन रास –

टॅरो कार्डनुसार जूनचा दुसरा आठवडा तुमच्यासाठी चांगला नसण्याची शक्यता आहे. त्यामुळे विचारपूर्वक वागा. सहकाऱ्यांशी चांगले संबंध ठेवा, स्थान परिवर्तन होऊ शकते. शिवाय आरोग्याशी संबधित समस्या वाढू शकतात.

कर्क रास –

टॅरो कार्डनुसार या काळात तुम्ही तणावात राहू शकता. तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग येऊ शकतो, ज्याचा तुमच्या नातेसंबंधांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणाशीही वाद होऊ शकतो.

सिंह रास –

या आठवड्यात तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवून कामं करा, नाहीतर केलेली कामे बिघडण्याची शक्यात आहे. कामाच्या ठिकाणीही सावधपणे वागणं चांगलं ठरु शकतं. प्रेम जीवनात चढ-उतार येऊ शकतात.

कन्या रास –

टॅरो कार्डनुसार या आठवड्यात तुमचे आरोग्य बिघडू शकते, स्वतःची काळजी घेण्याची गरज आहे, शक्यतो उधळपट्टी टाळा. जीवनसाथीच्या भावनांची काळजी घ्या. तुम्ही त्यांच्यासोबत आहात याची त्यांना जाणीव करून द्या.

तुळ रास –

या आठवड्यात तुमचा प्रभाव वाढू शकतो. तुमचे व्यक्तिमत्व इतरांना आकर्षित करण्याची शक्यता आहे. नोकरी-व्यवसायात प्रगती होण्यासह तुम्ही विजयाच्या मार्गावर पुढे जाऊ शकता.

वृश्चिक रास –

टॅरो कार्डनुसार वृश्चिक राशीतील नोकरदारांना प्रमोशन मिळू शकते. प्रगतीचे नवीन मार्ग उघडू शकतात, ज्याचा भविष्यात मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्या.

धनु रास –

टॅरो कार्डनुसार, या आठवड्यात तुम्ही कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करू शकता, परंतु जाताना स्वतःच्या आणि घराच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबातील सदस्यांशी वाद होण्याची शक्यता आहे. संयमाने वागा.

मकर रास –

टॅरो कार्डनुसार या आठवड्यात तुमचे तुमच्या कामावर लक्ष असेल याचा तुम्हाला फायदा देखील होण्याची शक्यता आहे. भावनिक होण्याऐवजी व्यावहारिकतेने काम करु शकता. लव्ह लाईफ खूप चांगली राहण्याची शक्यता आहे.

कुंभ रास –

टॅरो कार्डनुसार या आठवड्यात तुम्हाला नवीन यश आणि संधी प्राप्त होऊ शकतात. विशेषतः हा काळ व्यावसायिकांसाठी चांगला ठरु शकतो. तसेच तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात.

मीन रास –

टॅरो कार्डनुसार या आठवड्यात तुम्ही मोठी स्वप्ने पाहाल आणि ती पूर्ण करण्याच्या दिशेने वाटचाल करु शकता. या काळात तुम्ही महागड्या वस्तू खरेदी करू शकता. नवीन संबंध निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याचा भविष्यात फायदा होऊ शकतो.

हेही वाचा- धन राजयोग बनताच ‘या’ राशी होणार गडगंज श्रीमंत? शनिदेवाच्या कृपेने प्रचंड पैसा मिळण्याची शक्यता

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The second week of june these zodiac signs are likely to get huge wealth astrology tarot card prediction for 5 to 11 june 2023 jap