Trigrahi Yog On Mahashivratri: ज्योतिष शास्त्रानुसार, राशी परिवर्तन आणि ग्रहांची युती प्रत्येक राशीच्या लोकांच्या जीवनावर शुभ किंवा अशुभ प्रभाव टाकतात. तसेच फेब्रुवारी महिन्यात कुंभ राशीमध्ये तीन ग्रहांचा संयोग आहे. अशा परिस्थितीत सर्व राशीच्या लोकांवर याचा प्रभाव दिसून येईल. ज्योतिष शास्त्रानुसार यावेळी शनि कुंभ राशीत बसला आहे. यासोबतच सूर्य १३ फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करेल, तर चंद्रही १८ फेब्रुवारीला कुंभ राशीत प्रवेश करेल. अशा वेळी तीन ग्रहांच्या संयोगाने त्रिग्रही योग तयार होतो. या शुभ योगामुळे या तीन राशींना विशेष लाभ होईल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

महाशिवरात्रीचा दुर्मिळ योग

महाशिवरात्रीनिमित्त ३ राशींमध्ये ६ग्रह उपस्थित राहतील. ज्यामध्ये शुक्र आणि गुरू एकत्र मीन राशीत असतील. यासोबत पिता-पुत्र असलेले बुध आणि चंद्र मकर राशीत आणि सूर्य, शनि, पिता-पुत्र कुंभ राशीत असतील. अशा प्रकारे, मकर, कुंभ आणि मीन या तिन्ही राशींमध्ये ६ ग्रहांचा एक अत्यंत दुर्मिळ संयोग असेल. यातून अनेक राजयोग तयार होतील. उदाहरणार्थ, मालव्य योग, हंस योग आणि शश योग. याशिवाय या दिवशी शनिपुष्य योगही तयार होत आहे. अशा स्थितीत सूर्य आणि शनीचा संयोग अत्यंत शुभ मानला जातो आणि शुक्र, गुरू आणि नेपच्यून मीन राशीत राहतील.

मेष राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळेल!

कुंभ राशीतील तिन्ही ग्रहांचा संयोग मेष राशीच्या लोकांना विशेष लाभ देईल. कारण या राशीमध्ये तिन्ही ग्रह ११व्या भावात एकत्र आलेले आहेत. अशा परिस्थितीत नशिबाची साथ मिळाल्याने या राशीच्या लोकांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडतील. अनेक दिवसांपासून रखडलेले काम पुन्हा सुरू होणार आहे.

वृषभ राशीच्या लोकांना विशेष लाभाचे योग!

त्रिग्रही योग या राशीच्या लोकांना विशेष लाभ देईल. सूर्य, चंद्र आणि शनि यांच्या संयोगाने या राशीच्या लोकांना आर्थिक लाभासोबतच प्रत्येक क्षेत्रात यश मिळेल. यासोबतच नोकरी आणि व्यवसायात फायदा होईल.

मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभ!

या राशीमध्ये सूर्य, चंद्र आणि शनि यांच्या संयोगाने तयार झालेल्या दुसऱ्या घरात त्रिग्रही योग तयार होतो. हे घर वाणी आणि धनाचे स्थान मानले जाते. अशा स्थितीत मकर राशीच्या लोकांना अचानक धनलाभ होऊ शकतो. समाजात मान-सन्मान वाढेल. तुमच्या बोलण्याने अनेक कामांमध्ये यश मिळू शकते.

( हे ही वाचा: ‘केंद्र त्रिकोण राजयोग’ बनल्याने ‘या’ राशींचे भाग्य चमकणार? मिळू शकतो बक्कळ पैसा)

कुंभ राशीच्या लोकांसाठी नवीन नोकरीची संधी!

त्रिग्रही योग कुंभ राशीच्या लोकांसाठी फायदेशीर मानला जातो. अशा स्थितीत या राशीच्या लोकांची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल. उत्पन्नाचे नवीन स्रोत उघडल्याने नवीन नोकरीचा शोध पूर्ण होईल. यासोबतच आरोग्यही चांगले राहील.

(वरील बातमी माहिती आणि गृहीतके यांवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Trigrahi yoga on mahashivratri due to the combination of planets these zodiac sign can get huge amount of money gps