Vastu Tips for Kitchen: भारतीय महिलांना त्यांचे स्वयंपाकघर फार प्रिय असते. वास्तूमधील या भागामध्ये अन्नपूर्णा देवी वास करत असते असे म्हटले जाते. स्वयंपाकघरामध्ये सर्वांसाठी जेवण तयार केले जाते. कुटुंबातील सदस्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घरची वास्तू त्यातही स्वयंपाकघर वास्तुशास्त्राप्रमाणे असणे आवश्यक मानले जाते. या जागेच्या रचनेचा प्रभाव घरामध्ये राहणाऱ्यांवर होत असतो. ऑल इंडिया इन्सिट्यूट ऑफ ऑकल्ट सायन्सच्या सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ मल्लिका मल्होत्रा यांनी स्वयंपाकघराची रचना कशी असावी याची सविस्तर माहिती दिली आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
- स्वयंपाकघर नेहमी घरात्या आग्नेय दिशेला असावे. आग्नेय ही आग किंवा अग्नी देवतेची दिशा आहे अशी धारणा आहे. जेवण तयार करण्यासाठी अग्नीची आवश्यकता असल्याने आग्नेय दिशेला स्वयंपाकघर असणे शुभ मानले जाते. याच दिशेला विद्युत उपकरणे देखील ठेवावीत. ईशान्य दिशेला, कोपऱ्यामध्ये किंवा शौचालयाजवळ स्वयंपाकघर असणे वास्तुशास्त्रानुसार चुकचे समजले जाते.
- गॅस, स्टोव्ह, शेगडी ही नेहमी आग्नेय दिशेला ठेवावी. गावाला चूलीची मांडणी या पद्धतीने करावी. त्याचे तोंड पूर्वेकडे असावे जेणेकरुन जेवण बनवताना उगवत्या सूर्यांकडे तोंड करुन उभे राहाल. जेवण बनवणाऱ्या व्यक्तीचे तोंड पूर्वेला असल्यामुळे सकारात्मक वातावरण निर्माण होते. असे करणे शुभ देखील मानले जाते.
- स्वयंपाकघराचा रंग पिवळा, पांढरा किंवा यांच्या शेड्समध्ये असावा. फरशी देखील या रंगसंगतीमध्ये असाव्यात. हे रंग सकारात्मकता आणि आनंद यांच्याशी संबंधित असल्याने जेवण बनवणाऱ्यामध्ये उत्साह टिकून राहतो.
३० वर्षांनंतर तयार होणार बुध- शनिदेवाची युती; ‘या’ ३ राशींना वर्षभर मिळू शकतो बक्कळ पैसा
- पिण्याच्या पाण्याचे स्थान वायव्य दिशेला असावे. वायव्य दिशा ही जल या तत्त्वाशी संलग्न असते असे म्हटले जाते. तर नैऋत्येला रेफ्रिजरेटर ठेवावा.
- स्वयंपाकघराला प्रशस्त खिडक्या असाव्यात. यामुळे तेथे वारा खेळता राहतो. सूर्यकिरणे घरात आल्याने आनंदी वाटते. स्वयंपाकघरामध्ये पूर्व किंवा उत्तर दिशेला खिडकी असणे फायदेशीर असते.
- नैऋत्य दिशा ही पृथ्वी किंवा भूमी तत्त्वाशी संलग्न असते. स्थिरता आणि संतुलन यासाठी नैऋत्य दिशेला सामान ठेवणे योग्य समजले जाते.
- स्वयंपाकघरामध्ये भांडण करणे टाळावे. तेथे तुळस, कोरफड अशा वनस्पती देखील ठेवू शकता.
एकनाथ शिंदेंच्या हाती गूढ माहिती असल्याने आता विरोधक..ज्योतिष तज्ज्ञांचं भविष्यवाणीतून मोठं भाकीत
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
First published on: 22-02-2023 at 19:26 IST
मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vastu tips for kitchen build your kitchen according to vastushastra read do and donts yps