Venus Enter in purvabhadra nakshatra 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. शुक्र ग्रहाच्या राशी परिवर्तनाचा आणि नक्षत्र परिवर्तनाचा प्रभाव १२ राशींच्या व्यक्तींवर विविध प्रकारे पाहायला मिळतो. दरम्यान, आता येणाऱ्या चैत्र नवरात्रीच्या काळात शुक्र गुरूच्या नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून त्याच्या हा नक्षत्र परिवर्तनाचा शुभ प्रभाव काही राशींच्या व्यक्तींवर पाहायला मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पंचांगानुसार, शुक्र १ एप्रिल रोजी सकाळी ४ वाजून २५ मिनिटांनी पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करणार असून तो २६ एप्रिलपर्यंत याच नक्षत्रामध्ये विराजमान असेल. ज्यामुळे काही राशीच्या व्यक्तींचे भाग्य चमकण्यास मदत होईल.

तीन राशींचे नशीब चमकणार

वृषभ

शुक्र पूर्व भाद्रपद नक्षत्रामध्ये प्रवेश करून या राशीच्या अकराव्या घरामध्ये विराजमान होईल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील. जोडीदारबरोबर सुखाचे क्षण व्यतीत कराल. प्रेमसंबंधही मजबूत होतील. भौतिक सुख प्राप्त कराल.

मकर

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन मकर राशीच्या व्यक्तींसाठी खूप अनुकूल सिद्ध होईल. या राशीच्या शुक्र तिसऱ्या घरात विराजमान असेल. या काळात मकर राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. जोडीदाराची साथ मिळेल आणि दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील. आकस्मिक धनलाभ होईल. गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल.

कुंभ

शुक्राचे नक्षत्र परिवर्तन कुंभ राशीच्या व्यक्तींना सकरात्मक फळ देईल. या राशीच्या शुक्र दुसऱ्या घरात विराजमना असेल. तुम्हाला अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांबरोबर चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल. कुटुंबात शांततेचे वातावरण राहील. नोकरी करणाऱ्यांची पगारवाढ होईल. तसेच अडकलेले पैसे मिळतील.

(टीप: सदर लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venus enter in purvabhadra nakshatra these three zodiac signs will increase wealth and material happiness sap