Venus Transit 2024: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला धन, संपत्ती, सौंदर्य, भौतिक सुख व आकर्षणाचा कारक ग्रह मानला जातो. ज्या व्यक्तींच्या कुंडलीत शुक्र मजबूत असतो. अशा व्यक्तींना आयुष्यात कधीही कुठलीच आर्थिक चणचण भासत नाही. त्याशिवाय अशा व्यक्तीचे प्रेमसंबंधदेखील उत्तम असतात. ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रह १९ मे रोजी सकाळी ८ वाजून ५१ मिनिटांनी वृषभ राशीत प्रवेश करेल. शुक्राच्या वृषभ राशीतील प्रवेशाने १२ राशींपैकी काही राशींच्या व्यक्तींना विशेष लाभ मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

तसेच शुक्राच्या राशीपरिवर्तनाने अनेक योगदेखील तयार होणार आहेत. या काळात वृषभ राशीतील गुरू व शुक्र यांच्या युतीमुळे गजलक्ष्मी योग निर्माण होईल; तर वृषभ राशीतील शुक्र, सूर्य यांच्या युतीमुळे शुक्रादित्य योग निर्माण होईल. हे योग काही राशींच्या व्यक्तींसाठी उत्तम ठरतील.

तीन राशींसाठी शुक्राचे राशीपरिवर्तन लाभदायी

कर्क

कर्क राशीमध्ये शुक्र चौथ्या आणि अकराव्या घराचा स्वामी आहे. स्वराशीत प्रवेश केल्यामुळे शुक्र कर्क राशीच्या अकराव्या घरामध्ये विराजमान होईल. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना आयुष्यात खूप नवे बदल दिसून येतील. त्यांची अनेक दिवसांपासून अडकलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक चणचण दूर होईल आणि उत्पन्नाचे नवे मार्ग मोकळे होतील. कुटुंबीयांसोबतचे संबंध अधिक घट्ट होतील. नोकरी करणाऱ्यांना कामात सकारात्मक बदल दिसून येतील. प्रेमसंबंध सुखमय होतील.

मकर

मकर राशीमध्ये शुक्र पाचव्या किंवा दहाव्या घराचा स्वामी असून, शुक्र आता मकर राशीच्या पाचव्या घरात प्रवेश करील. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना अनेकदा कामामुळे दूरचे प्रवास करावे लागतील. मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल. कुटुंबातही आनंदी आनंद असेल. त्याशिवाय तुम्ही त्यांच्यासोबत पिकनिकचा प्लानदेखील कराल. नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळेल. वरिष्ठांची मदत मिळेल. विद्यार्थ्यांसाठीदेखील हा उत्तम काळ आहे. या काळात करिअरमध्ये यश मिळेल; तसेच प्रमोशनही मिळेल.

हेही वाचा : सूर्याचा जबरदस्त प्रभाव! १४ जूनपर्यंत ‘या’ राशीच्या व्यक्तींना होणार आकस्मिक धनलाभ

कुंभ

कुंभ राशीत शुक्र चौथ्या आणि नवव्या घराचा स्वामी आहे. वृषभ राशीतील प्रवेशानंतर शुक्र कुंभ राशीत प्रवेश करील. त्यामुळे कुंभ राशीच्या व्यक्तींची आर्थिक परिस्थिती उत्तम राहील. कर्ज फेडण्यास मदत होईल. वाहन, स्थावर मालमत्ता खरेदी करण्याची इच्छा पूर्ण होईल. कुटुंबीयांसोबतचे नाते अधिक घट्ट होईल. आरोग्य उत्तम राहील.

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Venus transit 24 venus will do the goods the persons of these three signs will get happiness prosperity and wealth sap