Shukra Nakshatra Transit on 3 September 2025: ज्योतिषशास्त्रानुसार शुक्र ग्रहाला प्रेम, भौतिक सुख, वैभव व संपन्नतेचा कारक मानले जाते. ३ सप्टेंबर २०२५ रोजी शुक्र ग्रह पुष्य नक्षत्र सोडून बुधाच्या स्वामित्वाखालील आश्लेषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. हा बदल सामान्य नाही, तर काही राशींसाठी तो आयुष्यभर लक्षात राहील असे सुखद परिणाम घडविणारा ठरणार आहे. विशेष म्हणजे या ग्रहबदलामुळे चार भाग्यवान राशींना पैसा, प्रेम आणि वैवाहिक जीवनात मोठा आनंदाचा क्षण लाभणार आहे. चला तर पाहूयात कोणत्या आहेत, या भाग्यशाली राशी…

शुक्रदेव पुष्य नक्षत्र सोडताच सुरू होणार सुवर्णकाळ! ‘या’ राशींना मिळणार सुख?

मेष

हा कालखंड मेष राशीच्या लोकांसाठी अत्यंत सकारात्मक राहणार आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अनुकूल आहे. पैसे वाचवण्यात तुम्ही यशस्वी व्हाल. या काळात वाहन किंवा मालमत्ता खरेदी करू शकता. जोडीदाराशी जवळीक वाढेल. त्याचबरोबर आर्थिक क्षेत्रातही शुभ संकेत मिळू शकतात. समाजात आदर आणि प्रतिष्ठा मिळू शकेल.

वृश्चिक

हा काळ वृश्चिक राशीच्या लोकांसाठी शुभ परिणाम घेऊन येणारा ठरू शकतो. या काळात तुम्हाला नशिबाची पूर्ण साथ मिळू शकते. तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात. व्यवसायात तुम्हाला चांगला नफा मिळू शकतो. तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती मिळू शकते. तुम्हाला वाहनसुख मिळू शकते. या काळात घरातील वातावरण प्रसन्न राहील आणि सुख-सुविधांवरही खर्च करण्याची संधी मिळेल.

मकर

मकर राशीच्या लोकांचे चांगले दिवस सुरु होऊ शकतात. विवाहितांसाठी नात्यातील ताणतणाव संपून गोडवा वाढेल. काही जण आपल्या जोडीदारासोबत व्यवसाय सुरू करण्याचाही विचार करतील. सामाजिक स्तरावर तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि करिअरमध्ये नवे दरवाजे उघडून, मोठा धनलाभ होण्याची शक्यता आहे. तसेच या वेळी वाहन आणि मालमत्तेचे सुख मिळू शकेल.

मीन

हा काळ मीन राशीसाठी अत्यंत खास ठरणार आहे. ज्यांचे आधीपासून प्रेमसंबंध आहेत, त्यांच्यासाठी लग्नाचा मार्ग मोकळा होऊ शकतो. ‘चट मंगनी पट लग्न’ अशा प्रकारे गोष्टी झपाट्याने घडू शकतात. या काळात वेळोवेळी अचानक आर्थिक लाभ मिळू शकतो. आर्थिक परिस्थिती चांगली राहू शकेल. बेरोजगारांना नोकऱ्या मिळू शकतात. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. लोकसत्ता या गोष्टींना दुजोरा देत नाही.)