Premium

पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला ‘या’ राशींवर विघ्नराजाची कृपा बरसणार; आजपासून तुम्हाला कसा होईल फायदा?

Sankashti Chaturthi 2023: विशेष म्हणजे आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. कालच बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश करत सूर्यासह युतीने बुधादित्य राजयोग साकारला आहे. अशात…

Vighnaraj Sankashti Chaturthi In Pitru Paksha Tithi Today These Four Rashi To Get Bappa Blessing With More Money Love Astro
पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला, आज 'या' ४ राशींची होईल भरभराट? (फोटो: लोकसत्ता ग्राफिक्स टीम)

Pitru Paksha Sankashti Chaturthi 2023 October: नारद पुराणानुसार संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणरायाची मनोभावे पूजा केल्याने बाप्पा भक्तांची सुख- समृद्धी व आनंदाने भरभराट करतात. प्रत्येक महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षात एक संकष्टी चतुर्थी येत असते. यानुसार भाद्रपद महिन्यातील संकष्टी चतुर्थी आज म्हणजेच २ ऑक्टोबरला आहे. या चतुर्थीला विघ्नराज संकष्टी चतुर्थी असेही म्हटले जाते. पंचांगानुसार आज सकाळी ७ वाजून ३६ मिनिटांनी चतुर्थी तिथी प्रारंभ झाला आहे तर ३ ऑक्टोबरच्या सकाळची ६ वाजून ११ मिनिटांपर्यंत हा शुभ काळ कायम असणार आहे. संख्याकाळी ४ वाजून ३७ मिनिटांपासून पुढील तीन तास गणरायाच्या पूजेसाठी अत्यंत शुभ कालावधी आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

विशेष म्हणजे आज संकष्टी चतुर्थीच्या दिवशीच शुक्र ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. कालच बुध ग्रहाने कन्या राशीत प्रवेश करत सूर्यासह युतीने बुधादित्य राजयोग साकारला आहे. अशात आज शुक्राच्या ग्रह गोचरानंतर काही राशींचे भाग्य उजळणार आहे. तुमच्यावर कोणत्या रूपात विघ्नराज गणरायाची कृपा बरसणार हे सुद्धा पाहूया…

पितृपक्षातील संकष्टी चतुर्थीला, आज ‘या’ ४ राशींची होईल भरभराट?

मेष रास (Aries Rashi Bhavishya)

आजच्या दिवशी तुमच्यावर चंद्रमाची कृपा असणार आहे. करिअरच्या बाबतीत प्रगतीचे योग आहेत. गुंतवणुकीशी संबंधित एखादी शुभ वार्ता कानी येऊ शकते. वादविवादापासून शक्य तितके लांबच राहा. विद्यार्थ्यांना शैक्षणिक खर्चातून सूट मिळवून देणारी एखादी घटना घडू शकते. थोडक्यात आज मेष राशीच्या नशिबात बचतीचे योग आहेत.

वृषभ रास (Taurus Rashi Bhavishya)

शुक्र गोचरच्या शुभ प्रभावामुळे तुमचे कौटुंबिक जीवन खूप आनंदी असेल आणि नशीबाची साथ मिळेल. उत्पन्न वाढेल. या काळात तुम्ही नवीन वाहन खरेदी किंवा मालमत्तेत गुंतवणूक करण्याचा विचार करू शकता. तुमच्या कुटुंबाच्या भौतिक सुखसोयींसाठी तुम्ही आवश्यक वस्तू खरेदी करू शकता. बँकेचे व्यवहार तुम्हाला लभ मिळवून देऊ शकतात.

कन्या रास (Virgo Rashi Bhavishya)

कन्या राशीत अगोदरच बुधादित्य राजयोग तयार आहे, अशातच संकष्टी व शुक्र गोचराचा सुद्धा प्रभाव कन्या राशीवर पडणार आहे. विशेषत: जे लोक परदेशाशी संबंधित व्यवसाय करतात, त्यांच्यासाठी पुढील काही दिवसांचा कालावधी खूप फायदेशीर ठरू शकतो. परदेशात जाण्याची तुमची इच्छाही पूर्ण होऊ शकते. मनामध्ये आनंदाची भावना राहील. तुमच्या उत्पन्नात अचानक वाढ होऊ शकते.

हे ही वाचा<< ८ ऑक्टोबरपर्यंत ‘या’ राशींच्या कुंडलीत बदलाचे संकेत; तुमच्या राशीची नाती, नोकरी व पैशाची गणितं कशी सुटणार?

तूळ रास (Libra Rashi Bhavishya)

संकष्टीच्या दिवशीच शुक्राचे संक्रमण कुंभ राशीच्या लोकांसाठी आर्थिक समृद्धी वाढवणारे मानले जाते. तुमच्या जोडीदाराबरोबरचे तुमचे सर्व गैरसमज दूर होतील आणि तुम्ही पूर्वीपेक्षा एकमेकांच्या जवळ येऊ शकता. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर मिळून कोणताही व्यवसाय करत असाल तर यावेळी तुमच्या व्यवसायात भरभराट होऊ शकते. बोलण्यातून लोकांवरती प्रभाव पाडाल.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)

मराठीतील सर्व राशी वृत्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Vighnaraj sankashti chaturthi in pitru paksha tithi today these four rashi to get bappa blessing with more money love astro svs

First published on: 02-10-2023 at 09:47 IST
Next Story
दिवाळीपूर्वी ‘या’ राशींच्या लोकांचे नशीब पालटणार? केतू राशी परिवर्तन करताच अमाप संपत्ती मिळण्याची शक्यता