Zodiac Signs Who Annoys Partners: राशिचक्रातील प्रत्येक राशीचा एक वेगळा स्वभाव असतो. यानुसार प्रत्येक परिस्थितीत विशिष्ट राशीची लोकं ठराविक पद्धतीने वागू शकतात. राशींच्या स्वभावाचा अभ्यास केल्यास तुम्हालाही तुमच्या आयुष्यातील अनेकांचे गुण व ते अमुक पद्धतीने का प्रतिक्रिया देतात हे समजू शकते. आपल्या आयुष्यातील जोडीदार हा सर्वाधिक काळासाठी आपल्याबरोबर असणार असे समजले जाते त्यामुळे या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला जुळतोय का हे पाहणे महत्त्वाचे ठरते. आज आपण राशीचक्रातील काही खोडकर व खेळकर स्वभाव असणाऱ्या राशींचे लोक जाणून घेणार आहोत. जर तुमच्या जोडीदाराची रास यापैकी असेल तर तुम्हालाही यातील बहुतांश गोष्टी पटू शकतात. असं म्हणतात या राशींना आपल्या जोडीदाराला त्रास द्यायला किंवा खोड काढायला खूप आवडते, कोणत्या आहेत या राशी, जाणून घ्या…

मेष: या राशीचे लोक हसतमुख स्वभावाचे असतात, असे मानले जाते. या लोकांमध्ये नेहमी ऊर्जा भरभरून असते, त्यामुळे त्यांच्या सह राहणाऱ्या किंवा नुसतं बोलणाऱ्यांना सुद्धा तू खूप ऊर्जा देऊन जातात. जोडीदाराच्या बाबत त्यांना खोड काढून गमतीत हसवणे हे मेष राशीच्या मंडळींना खूप आवडते.

मिथुन: मिथुन ही सर्वात प्रेमळ रास मानली जाते. या मंडळींना ज्या व्यक्तीचा लळा असतो त्यासाठी ते कोणत्याही कठीण कामाला पूर्ण करू शकतात. पण समोरच्याला प्रेम दाखवताना त्यांना मस्करी करणे, चिडवणे अशा सवयी असतात. प्रेम व्यक्त करताना अनेकदा त्यांना मर्यादा लक्षातही येत नाहीत.

सिंह: सिंह रास ही राजेशाही रास मानली जाते. म्हणूनच काही वेळा या राशीचे लोक पार्टनरकडे अत्यंत मोजक्याच शब्दात प्रेम व्यक्त करतात व अन्य वेळी टोमणे मारणे, डिवचणे असा त्यांचा स्वभाव असतो. जर सिंह राशीच्या व्यक्तीचा पार्टनर हा बोलका स्वभाव असलेल्या राशींमधील असेल तर मात्र यामुळे खरोखरच चिडचिड व त्रास होऊ शकतो.

धनु: धनु ही हळवी रास मानली जाते. पण या मंडळींचा स्वभाव हा तितकाच विनोदी असतो. यांना इतरांना चिडवत राहणे, खोड काढणे आवडते त्यामुळे आपल्या जोडीदारावर प्रॅन्क करण्यात ही लोकं पुढे असतात. काहीवेळा यांचा हळवा स्वभाव पाहता नेमकं काय बोलावं हे समजण्यात अडथळा येऊन जोडीदाराची चिडचिड होऊ शकते.

हे ही वाचा<<१०० वर्षांनी केंद्र त्रिकोण राजयोग ‘या’ राशींच्या कुंडलीत होतोय तयार; अमाप पैसे कमावून करोडपती व्हायची संधी

कुंभ: कुंभ ही राशीचक्रातील सर्वच राशींचे स्वभाव गुण एकत्र बाळगणारी रास आहे. कुंभ राशीचे लोक मस्करी करतानाही इतक्या गांभीर्याने करतात की समोरच्याला त्यांचा डाव लक्षातही येत नाही. मात्र या राशीच्या मंडळींना त्यांची मस्करी केलेले आवडत नाही. खेळकर स्वभाव असल्याने सर्वांना या राशीच्या लोकांसह हसत खेळत राहता येते.

(टीप: वरील लेख हा प्राप्त माहितीवर आधारित आहे)