न्यायालयीन खटला मागे घ्यावा यासाठी धमकी देत जीभ कापण्याचा प्रयत्न झाल्याने उदगीर तालुक्यात खळबळ उडाली आहे.
डाऊळ हिप्परगा येथील विवाहितेच्या बाबतीत घडलेल्या या घटनेतील आरोपी पतीसह चौघा जणांविरुद्ध वाढवणा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात झाला आहे. चौघेही आरोपी फरार आहेत.
डाऊळ हिप्परगा गावातील अरुणा दिगंबर बुमनर या विवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न केल्याच्या कारणावरून तिचा पती व अन्यांवर न्यायालयात खटला सुरू होता. तो खटला सुरू असताना विवाहितेला न्यायालयात बोलताच येऊ नये म्हणून तिची जीभ कापण्याचा प्रयत्न पती दिगंबर बुमनर, नणंद संगीता श्रीरामे, तिचा पती बालाजी श्रीरामे, भाची मीना श्रीरामे यांनी केला. या झटापटीत विवाहितेच्या गालाला आतून जखमा झाल्या आहेत. न्यायालयातील खटला मागे न घेतल्यास जिवे मारण्याची धमकी देत चौघेही फरार झाले. अरुणा बुमनर यांच्या फिर्यादीवरून वाढवणा पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध रीतसर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 17th Nov 2015 रोजी प्रकाशित
विवाहितेची जीभ कापण्याचा प्रयत्न
खटला सुरू असताना विवाहितेला न्यायालयात बोलताच येऊ नये म्हणून तिची जीभ कापण्याचा...

First published on: 17-11-2015 at 03:25 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cut tongue crime police