धाराशिव : नवीन वर्ष आणि ख्रिसमस नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या वाढली आहे. भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेता, तुळजाभवानी देवीचे मंदिर २२ तास दर्शनासाठी खुले ठेवण्याचा निर्णय मंदिर संस्थानने घेतला आहे. सोमवार, २५ डिसेंबर ते रविवार, ३१ डिसेंबरपर्यंत तुळजाभवानी देवीचे दरवाजे भाविकांसाठी २२ तास खुले राहणार आहेत. दरम्यान या कालावधीत व्हीआयपी देणगी दर्शन पास तात्पुरत्या कारणास्तव बंद करण्यात आले असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नाताळच्या सुट्ट्या व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी येणार्‍या भाविकांची संख्या मागील काही दिवसांत वाढली आहे. त्यामुळे सर्व पुजारी, महंत, सेवेदारी व भाविकभक्तांच्या सुविधेसाठी मंदिर समितीने तुळजाभवानी देवीच्या दैनंदिन मंदिर वेळापत्रकात तात्पुरते बदल केले आहेत. नाताळाच्या सुट्टीनिमित्त होणारी गर्दी पाहता, २५ डिसेंबर रोजी तुळजाभवानी देवीचे चरणतीर्थ पहाटे १ वाजता होणार आहे. तसेच २७ डिसेंबरपासून ३१ डिसेंबरपर्यंत येणारे सर्व मंगळवार, शुक्रवार, रविवार आणि पौर्णिमा या दिवशी भाविकांचे दर्शन सुलभ व्हावे, याकरिता सकाळी होणारे चरणतीर्थ पहाटे होवून पुजेची घाट सकाळी ६ वाजता होईल, असे जाहीर करण्यात आले आहे.

हेही वाचा : “भाजपा आता संघाची राहिलेली नाही, विखेंनी ‘संघ दक्ष’ करुन दाखवावे”, अंबादास दानवे यांची टीका

सकाळी ६ ते १० त्याचबरोबर सायंकाळी ७ ते ९ या वेळेत तुळजाभवानी देवीची अभिषेक पुजा राहणार आहे. या कालावधीत देणगी दर्शन बंद राहील, याची नोंद सर्व भाविकांनी घ्यावी, असेही तुळजाभवानी मंदिर समितीचे व्यवस्थापक तहसीलदार सोमनाथ माळी यांनी जाहीर केले आहे. २४ ते २७ डिसेंबर या कालावधीत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच प्रशासकीय कारणास्तव व्हीआयपी देणगी दर्शन पास सुविधा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. कायदा सुव्यवस्था व इतर बाबींची पडताळणी करून पुढील निर्णय घेतला जाईल, असे मंदिर समितीने जाहीर केले आहे. दरम्यानच्या काळात २०० रूपये मोजून देणगी दर्शन पास उपलब्ध असणार आहे, असे कळविण्यात आले आहे.

हेही वाचा : धर्मांतराच्या संशयावरून सुदान मधील तरुणाला अटक

मार्गशीर्ष पौर्णिमेनिमित्त धार्मिक विधी

मार्गशीर्ष पौर्णिमेच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिरात दरवर्षीप्रमाणे यंदाही विविध धार्मिक विधी पार पडणार आहेत. २५ डिसेंबर रोजी रात्री तुळजाभवानी देवीची छबिना मिरवणूक होणार आहे. तर २६ डिसेंबर रोजी मंगळवारी छबिना आणि जोगवा दोन्ही विधी पार पडणार आहेत. बुधवारी रात्री छबिना मिरवणूक राहणार असल्याचे मंदिराने जाहीर केले आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In dharashiv tulja bhavani temple to be opened for 22 hours and vvip darshan stopped for 7 days css