KIa India ने आपल्या नवीन २०२३ किया सेलटॉस फेसलिफ्टचे दोन दिवसांपूर्वी अनावरण केले आहे. २०२३ किया सेलटॉस फेसलिफ्टच्या बुकिंगला १४ जुलैपासून सुरुवात होणार आहे. यामध्ये सध्या उपलब्ध असलेल्या सेलटॉसपेक्षा जास्त फीचर्स बघायला मिळत आहेत. अधिकृत किंमतीची घोषणा पुढील महिन्यात होणार आहे. नवीन Kia Seltos फेसलिफ्ट Hyundai Creta यांच्यातील स्पेसिफिकेशन्स आधारित तुलना जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

किया सेलटॉस आणि ह्युंदाई क्रेटा : इंजिन आणि गिअरबॉक्स

2023 Kia Seltos आणि Hyundai Creta मध्ये ११३ बीएचपीचे १.५ लिटरचे नैसर्गिक एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आणि ११३ बीएचपीचे १.५ लिटरचे डिझेल इंजिन मिळते. तथापि फेसलिफ्टऐड सेलटॉसला नवीन १५८ बीएचपी १.५ लिटर टर्बो पेट्रोल इंजिन देखील मिळते ते या कारला त्याच्या सेगमेंटमधील सर्वात शक्तिशाली SUV बनवते. कंपनी इंजिनवर आधारित असे MT, iMT, AT, IVT आणि DCT असे एकूण पाच ट्रान्समिशन पर्याय देते.

क्रेटामध्ये २.० लिटर ४ सिलेंडरचे एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन आहे जे १५७ बीएचपी आणि १८८ एनएम पीक टॉर्क जनरेट करते. याचे फ्लेक्स फ्युएल सिरीज १६७ बीएचपी पॉवर आणि २०२ एनएम टॉर्क जनरेट करते.यामध्ये तुम्हाला ६ स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटिक गिअरबॉक्स मिळणार आहे. नवीन Hyundai Creta N Line Night Edition ला Advanced Driver Assistance System (ADAS) हे फिचर मिळते. अडॅप्टिव्ह ऑटोपायलट, लेन असिस्टन्स आणि ऑटो ब्रेकिंग सारखे फीचर्स अनेक फीचर्स ADAS मध्ये उपलब्ध आहेत.

हेही वाचा : Grand Vitara, Creta शी स्पर्धा करणाऱ्या २०२३ Kia सेलटॉस फेसलिफ्टच्या बुकिंगला ‘या’ तारखेपासून होणार सुरुवात

फीचर्स आणि सेफ्टी

किया सेलटॉस आणि ह्युंदाई क्रेटा नेहमीच भरपूर फीचर्सनी समाविष्ट असलेल्या एसयूव्ही आहेत. नवीन किया सेलटॉस फेसलिफ्टमध्ये देखील अनेक फीचर्स देण्यात आले आहेत. हेच नवीन फीचर्स या कारला अजून खास बनवतात. इंटेरिअर बद्दल बोलायचे झाल्यास अपडेटेड सेलटॉसला दोन १०. २५ इंचाचे डिस्प्ले मिळतात. ज्यामध्ये एक इन्फोटेनमेंट सिस्टम म्हणून काम करतो तर दुसरा इन्स्ट्रुमेंट क्लस्टर म्हणून काम करतो. प्रीमियम बोस स्पीकर, वायरलेस चार्जिंग, पॅनोरॅमिक सनरूफ, व्हेंटिलेटेड सीट्स, ड्युअल झोन क्लायमेट कंट्रोल आणि इतर अनेक फीचर्स नवीन किया सेलटॉस २०२३ मध्ये जोडण्यात आली आहेत.

किंमत

ह्युंदाई क्रेटाची सध्याची किंमत १०.८७ लाख रुपये ते १९.२० लाखांपर्यंत आहे. तथापि नवीन किया सेलटॉसची किंमत १०.९९ लाख रुपये ते २०.९९ लाख रुपयांपर्यंत असण्याची शक्यता आहे. या सर्व किंमती या एक्स शोरूम किंमती आहेत. नवीन सेलटॉस फेसलिफ्ट X-Line, GT-Line आणि Tech-Line या तीन व्हेरिएंटमध्ये ऑफर केली जाईल.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2023 kia seltos facelift vs hyundai creta comparison price safety features engine check details tmb 01