Electric Car Buying Tips: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या गगनाला भिडलेल्या किमतींमुळे इलेक्ट्रिक वाहनांची (Electric Vehicles) मागणी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे लोक मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक वाहने खरेदी करताना दिसत आहेत. सध्या जर तुम्हीही इलेक्ट्रिक कार (Electric Car) घेण्याचा विचार करत असाल तर, आधी काही महत्वाच्या गोष्टी जाणून घेणे फार गरजेचे आहे. कारण नकळत इलेक्ट्रिक वाहन घेणे तुमच्यासाठी महागात पडू शकते. चला तर जाणून घेऊया इलेक्ट्रिक कार खरेदी करताना कोणत्या गोष्टी विशेष ध्यानात ठेवायला हव्यात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

इलेक्ट्रिक कार खरेदी करताना ‘या’ गोष्टींकडे विशेष लक्ष द्या

१. ड्रायव्हिंग रेंज
इलेक्ट्रिक कारमध्ये ड्रायव्हिंग रेंज ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ड्रायव्हिंग रेंज जितकी जास्त असेल तितके ग्राहकांसाठी ते अधिक चांगले असेल. रोजच्या ड्राईव्हसाठी इलेक्ट्रिक कार १०० किमी पेक्षा जास्त धावणे फायदेशीर आहे. हाय-एंड कारबद्दल बोलायचे तर त्यांची ड्रायव्हिंग रेंज ४०० किमी पर्यंत आहे.

२. चार्जिंग सुविधा

इलेक्ट्रिक वाहन खरेदी करताना सर्वात महत्त्वाच्या गोष्टींपैकी एक म्हणजे चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर स्थिती. ग्राहकाच्या घराजवळ चार्जिंग स्टेशन आहेत की नाही आणि त्याच्या घरी चार्जिंगची सुविधा आहे की नाही ही गोष्ट अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कार चार्ज करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे ती जेथे पार्क केली जात आहे तेथे चार्जिंग सुविधा असणे जास्त सोयीचे ठरेल.

(आणखी वाचा : तुमच्याही कारचा टायर पंक्चर झालायं? मग जाणून घ्या ‘टायर पंक्चर रिपेअर किट’ कसं काम करतं?)

३. कर सवलत
इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारही खूप प्रयत्न करत आहे. इलेक्ट्रिक कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना सरकार विविध प्रकारचे कर सवलत देते. जर तुम्ही इलेक्ट्रिक कार घेण्याचा विचार करत असाल तर या फायद्यांबद्दल नक्कीच जाणून घ्या.

४. बॅटरीचे आयुष्य
बॅटरी पॅक कोणत्याही इलेक्ट्रिक कारचा सर्वात महाग आणि आवश्यक घटक आहे. कारमधील बॅटरी पॅक बदलणेही तुमच्या खिशाला भारी पडू शकते. त्यामुळे इलेक्ट्रिक कार घेण्यापूर्वी बॅटरीचे आयुष्य किती आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे.

५. चार्जिंग पर्याय
कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला चार्जिंग पर्यायांबद्दल माहिती असणे आवश्यक आहे. जगात इलेक्ट्रिक कारची मोठी श्रेणी आहे. फास्ट चार्जिंग, स्टँडर्ड चार्जिंग आणि स्लो चार्जिंग असे पर्याय आहेत. जलद चार्जर बसवण्यासाठी खूप खर्च येतो. घरामध्ये स्टँडर्ड आणि स्लो चार्जिंग सारखे पर्याय देखील आहेत.

(आणखी वाचा : खुशखबर: ‘इतक्या’ स्वस्तात खरेदी करा Mercedes-Benz; पाहा ऑफर्स )

६. सॉफ्टवेअर अपडेट

प्रगत तंत्रज्ञान असलेली इलेक्ट्रिक वाहने किंवा कार बाजारात दाखल झाल्या आहेत. कार उत्पादक सहसा सॉफ्टवेअर अपडेट्सद्वारे लेटेस्ट तंत्रज्ञान वापरतात. कार खरेदी करण्यापूर्वी, तुम्हाला रेग्युलर सॉफ्टवेअर अपडेट मिळत असल्याची खात्री करा. परदेशातील काही कार उत्पादक फ्री रेग्युलर सॉफ्टवेअर अपडेट देतात परंतु काही उत्पादक त्यासाठी पैसे आकारतात.

७. किंमत
इलेक्ट्रिक वाहन पर्यावरणासाठी खूप चांगले आहे परंतु महागड्या बॅटरी पॅकमुळे त्याची किंमत डिझेल-पेट्रोलपेक्षा जास्त आहे, त्यामुळे सर्वात आधी त्याची किंमत जाणून घेणे आवश्यक आहे. एका छोट्या हॅचबॅक इलेक्ट्रिक कारची किंमत ६ लाखांपेक्षा जास्त आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Be careful when buying an electric car otherwise you may suffer damage pdb