दुचाकींच्या विक्रीचा विचार केला तर मोटारसायकलला सर्वाधिक मागणी आहे. मात्र, काही स्कूटर्स अशाही आहेत, ज्या सतत बाईकला टक्कर देत असतात. या सेगमेंटमध्ये अशीच एक स्कूटर आहे, ज्याच्या समोर बजाज टीव्हीएस सारख्या कंपनीच्या लोकप्रिय बाईक्स देखील फिक्या पडतात. प्रसिद्ध दुचाकी उत्पादक कंपनी होंडाच्या बाईक आणि स्कूटर्सला भारतीय बाजारात मोठी मागणी आहे. अशातच बाजारात होंडाच्या एका स्कूटरला मोठी मागणी असून ही देशात सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्कूटरपैकी एक आहे. 

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

होंडा आपल्या स्कूटरमध्ये मजबूत इंजिन पॉवर आणि नवीन पिढीची वैशिष्ट्ये देते. या मालिकेत कंपनीची एक शक्तिशाली स्कूटर Honda Activa 6G आहे. Activa ही कंपनीची सर्वाधिक विक्री होणारी स्कूटर आहे. मे २०२४ मध्ये, कंपनीने Honda Activa 6G आणि Activa 125 यासह एकूण २१ लाख ६३ हजार ३५२ स्कूटरची विक्री केली आहे.

स्कूटरचा ८५ किमी प्रतितास इतका टॉप स्पीड

Honda Activa 6G च्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, ही स्कूटर १०९.५१ cc च्या पॉवरफुल इंजिनसह उपलब्ध आहे. उच्च पिकअपसाठी, ते ७.७३ bhp पॉवर जनरेट करेल. स्कूटरला मोठा हेडलाइट आणि आरामदायी हँडल बार देण्यात आला आहे, ज्यामुळे लांबच्या मार्गावर गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला थकवा येत नाही. ही एक हाय स्पीड स्कूटर आहे, जी रस्त्यावर ८५ किमी प्रति तासाचा टॉप स्पीड देते. या होंडा स्कूटरमध्ये एकूण ९ व्हेरियंट ऑफर केले जात आहेत. स्कूटरमध्ये सिंगल पीस आरामदायक सीट आणि ट्यूबलेस टायर आहेत.

(हे ही वाचा : Innova ना Fortuner मारुतीच्या ‘या’ स्वस्त ७ सीटर कारसमोर सर्वांची बोलती बंद! झाली तुफान विक्री, मायलेज २७ किमी )

स्कूटरमध्ये ५.३ लीटरची इंधन टाकी

लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी Honda Activa 6G ची इंधन क्षमता ५.३ लीटर आहे. स्कूटरचे एकूण वजन १०६ किलोग्रॅम आहे, ज्यामुळे उच्च वेगाने नियंत्रण करणे सोपे होते. ही स्कूटर एकूण सहा रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्कूटरमध्ये नवीन पिढीसाठी अलॉय व्हील आणि उच्च उर्जा निर्मिती आहे. ही स्कूटर साध्या हँडलबार आणि रियर व्ह्यू मिररसह येते. यात स्टायलिश टेललाइट आणि मोठा हेडलाइट आहे.

प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये

Activa 6G च्या दोन्ही टायरवर ड्रम ब्रेक आहेत. याशिवाय, अतिरिक्त सुरक्षिततेसाठी, यात एकत्रित ब्रेकिंग सिस्टम आहे, ही प्रणाली उच्च वेगाने ब्रेक मारताना स्कूटर नियंत्रित करण्यास मदत करते. स्कूटरच्या टायरचा आकार पुढील बाजूस १२ इंच आणि मागील बाजूस १० इंच आहे. स्कूटरमध्ये १८ लीटर अंडरसीट स्टोरेज आहे. बाजारात ही स्कूटर TVS Jupiter, Suzuki Access 125, Yamaha Fascino 125 आणि Hero Xoom सारख्या शक्तिशाली स्कूटरशी स्पर्धा करते. ही स्कूटर ७६,२३४ रुपये एक्स-शोरूमच्या सुरुवातीच्या किमतीत उपलब्ध आहे. स्कूटरचे टॉप मॉडेल ९६,९८४ रुपये ऑन-रोडमध्ये दिले जात आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Best selling scooters in may 2024 in india honda activa 6g and activa 125 pdb