भारत मोबिलिटी ऑटो एक्सपो २०२४ मध्ये, टाटा अल्ट्रोझ रेसर मॉडेलचे तयार मॉडेल सादर करण्यात आले आहे. भारतीय बाजारात आल्यानंतर त्याची स्पर्धा Hyundai च्या i20 N Line शी होईल. बाह्य शैलीच्या बाबतीत, अल्ट्रोझ रेसरला मध्यभागी पांढऱ्या पट्ट्यांसह रेसियर ड्युअल टोन रंग मिळतो. रेस रेडी डिझाईन तेही ड्युअल टोनमुळे टाटा अल्ट्रोझ रेसर लूकने अजूनच आकर्षक बनली आहे. 

भारत मोबिलिटी शो २०२४ मध्ये, हे मॉडेल त्याच्या प्रोडक्शन रेडी मॉडेलमध्ये सादर करण्यात आले आहे. यावेळी, हॅचबॅकची स्पोर्टियर आवृत्ती ड्युअल-टोन ऑरेंज आणि ब्लॅक कलर स्कीममध्ये दर्शविली आहे, छतावर दुहेरी रेसिंग पट्टयांनी सुसज्ज आहे. यात ब्लॅक-आउट हेडलॅम्प, ब्लॅक-फिनिश्ड मल्टीस्पोक अलॉय व्हील्स पॉवरफुल इंजिन, ६ एअरबॅग्ज, लार्ज टचस्क्रीन इन्फोटेनमेंट या कारमध्ये मिळतात. सनरूफ Altroz मध्ये प्रथमच, त्यात ब्लॅक-आउट सनरूफ आणि जेट ब्लॅक बोनेट आहे.

टाटा अल्ट्रोझ रेसरला स्टीयरिंग व्हील, एसी व्हेंट्स, अपहोल्स्ट्री लाइन्स आणि स्टिचिंगवर ऑरेंज हायलाइट्ससह ऑल-ब्लॅक इंटिरियर्स मिळतात. ऑल-ब्लॅक सीट अपहोल्स्ट्रीमध्ये कॉन्ट्रास्ट स्टिचिंग आणि पट्टे आहेत. मागच्या बाजूस एसी व्हेंट्स आणि ॲम्बियंट लाइटिंग यांचा समावेश आहे.

(हे ही वाचा : Auto Expo 2024: बाकी कंपन्यांची धाकधूक वाढली! होंडाने विशेष इंधनावर चालणाऱ्या बाईकला केलं सादर )

वैशिष्ट्ये

वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर, Altroz ​​Racer १०.२५-इंचाच्या इन्फोटेनमेंट सिस्टमसह सुसज्ज आहे जे नवीनतम वायरलेस स्मार्टफोन कनेक्टिव्हिटीला समर्थन देते. ७.०-इंच डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आणि हेड-अप डिस्प्ले (HUD) समाविष्ट करणारी ही टाटाची पहिली कार ठरली आहे. मानक म्हणून यामध्ये वायरलेस फोन चार्जिंग, हवेशीर फ्रंट सीट्स समाविष्ट आहेत.

पॉवरट्रेन

Tata Altroz ​​Racer चे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याचे इंजिन, स्पोर्टियर हॅचबॅकला Nexon वरून घेतलेले १.२L, ३-सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल. रेसर एडिशन १०bhp आणि ३०Nm टॉर्कच्या अतिरिक्त आउटपुटसह Altroz ​​iTurbo पेक्षा चांगली कामगिरी देते. हे इंजिन १२०bhp पॉवर आणि १७०Nm टॉर्क जनरेट करते, ज्यामुळे ते थेट Hyundai i20 N लाइनशी स्पर्धा करण्यास तयार होते.

लाँच आणि किंमत

Altroz ​​Racer च्या किमती पुढील काही महिन्यांत जाहीर होण्याची अपेक्षा आहे, त्यानंतर त्याची डिलिव्हरी सुरू होईल. त्याची किंमत i20 सारखीच असण्याची अपेक्षा आहे, ज्याची एक्स-शोरूम किंमत १०.१९ लाख १२.३१ लाख रुपये आहे.