Ultraviolet F77 Delivery Started: अल्ट्रावॉयलेट ऑटोमेटिव्ह नोव्हेंबर २०२२ ला आपली इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाइक Ultraviolette F77 लाँच केली होती. कंपनीने या बाईकसाठी बुकिंग विंडो उघडली होती. आता कंपनीने नवीन अल्ट्राव्हायोलेट F77, भारतातील पहिली उच्च-कार्यक्षमता इलेक्ट्रिक मोटरसायकलची डिलिव्हरी सुरू केली आहे. ही बाईक कंपनीने बंगळुरू येथे तयार केली आहे. कंपनी सध्या अल्ट्राव्हायोलेट उत्पादन प्लांटमधून बाईकचे थेट वितरण करत आहे. यासोबतच कंपनी देशभरात आपले डीलरशिप नेटवर्क तयार करत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

Ultraviolette F77 चे सर्वात खास वैशिष्ट्ये म्हणजे ही देशातील पहिली ‘मेड इन इंडिया’ इलेक्ट्रिक स्पोर्ट्स बाईक आहे. अल्ट्राव्हायोलेट F77 लिमिटेड एडिशनमध्ये १०.३kWh क्षमतेचा बॅटरी पॅक वापरण्यात आला आहे. यामध्ये बसवलेली इलेक्ट्रिक मोटर ४०.५bhp पॉवर आणि १०० Nm टॉर्क जनरेट करते. यामध्ये बसवण्यात आलेली बॅटरी एका पूर्ण चार्जमध्ये ३०७ किमीची रेंज देऊ शकते. यात ग्लाइड, कॉम्बॅट आणि बॅलिस्टिक असे तीन रायडिंग मोड मिळतात. या बाईकचा टॉप स्पीड १५२ kmph आहे. ही बाईक ३ सेकंदांपेक्षा कमी वेळेत ६० kmph चा वेग पकडते.

(हे ही वाचा : मारुतीची देशातली सर्वात स्वस्त कार अधिक सुरक्षित होऊन नव्या अवतारात दाखल, किंमत ५.८२ लाख )

F77 मध्ये वापरलेली रेकॉन इलेक्ट्रिक मोटर ३८.८bhp पॉवर आणि ९५ Nm टॉर्क जनरेट करते. ही बाईक ०-६० kmph चा वेग ३.१ सेकंदात आणि ८ सेकंदात ०-१०० kmph पकडते. त्याचा टॉप स्पीड १४७ किमी प्रतितास आहे. F77 मूळ ७.१kWh बॅटरी पॅकसह सुसज्ज आहे. या बॅटरी पॅकसह, बाईक २०६km ची श्रेणी आणि १४०kmph चा टॉप स्पीड देण्यास सक्षम आहे.

किंमत

Ultraviolet F77 ही बाईक KTM RC 390 शी स्पर्धा करते. Ultraviolet F77 या बाईकची सुरुवातीची किंमत ३.८० लाख रुपये आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Deliveries of the ultraviolette f77 have commenced three months since its official launch pdb