Did the police remove the car key Is that right | Loksatta

वाहतूक पोलीस तुमच्या गाडीची चावी आणि हवा काढू शकतात का? जाणून घ्या कायदा काय सांगतो

रस्त्याने गाडी चालवताना अनेक वेळा तुम्ही हे पाहिलं असेल की, पोलिस वाहनांना थांबवतात आणि कागदपत्रांची मागणी करतात. जर तुमच्याकडे वाहनांशीसंबंधीत कागदपत्र नसेल, तर पोलिस तुमच्यावरती कारवाई करतात. परंतु तुम्ही हे बऱ्याचदा पाहिले असेल की, पोलिस दुचाकी किंवा कारची चावी काढून घेतात किंवा गाडीच्या चाकामधील हवा काढतात. परंतु तुम्हाला हे माहित असणं गरजेचं आहे की, वाहतूक पोलिसांना असे करण्याचा कायद्याने अधिकार दिलेला आहे काय, जाणून घ्या संपूर्ण माहिती.

वाहतूक पोलीस तुमच्या गाडीची चावी आणि हवा काढू शकतात का? जाणून घ्या कायदा काय सांगतो
संग्रहित छायाचित्र

अनेकदा घाईत गाडीत चालवताना वाहन चालकांकडून चुका होतात. दुचाकी चालवताना चुकीच्या दिशेने गाडी चावल्यास, हेल्मेट घातले नसेल, वाहनाची लाईट किंवा हॉर्न सदोष असला तरी तो वाहन चालकाचा दोष मानला जातो. अशावेळी वाहतूक पोलीस गाडी अडवतात आणि नियमांनुसार योग्य कारवाई केली जाते. चलान भरावे लागू नये म्हणून अनेक जण विनंती करतात किंवा काहीजण पोलिसांशी हुज्जत घालतात, वाहन चालक ऐकत नसेल तर बऱ्याचवेळा वाहतूक पोलीस गाडीची चावी काढून घेतात.

वाहतूक पोलिसांच्या कारवाईदरम्यान अनेकवेळा काही पोलिसांची गैरवर्तणूकही पाहायला मिळते. कधी परवानगी न घेता दुचाकीची चावी काढतात तर कधी विनाकारण टायरची हवा काढतात. असे वागणे योग्य आहे असा विचारही केला आहे का? पोलिसांना असे वागण्याची परवानगी कायदा देतो का? चला तर मग जाणून घेऊया काय सांगतो नियम.

नियम काय सांंगतो जाणून घ्या

चेकिंग दरम्यान तुमच्या गाडीची चावी काढून हवा काढण्याचा अधिकार पोलिसांना नाही. जर एखादा हवालदार तुमच्या गाडीची चावी काढत असेल तर ते नियमांच्या विरोधात आहे. नियमानुसार, हवालदाराला कोणतेही वाहन पकडण्याचा किंवा जप्त करण्याचा अधिकार नाही. भारतीय मोटार वाहन कायदा १९३२ अन्वये, केवळ सहाय्यक उपनिरीक्षक किंवा त्यावरील दर्जाचा अधिकारीच चलन कापू शकतो. त्यांच्या मदतीला फक्त सैनिकच असतात.

(हे ही वाचा : ‘या’ कागदपत्राच्या माध्यमातून आता घरबसल्या घ्या आरटीओशीशी संबंधीत ५८ सेवांचा लाभ )

वाहतूक पोलीस चावी काढू शकत नाहीत

याशिवाय वाहतूक हवालदार तुमच्या वाहनाच्या चाव्याही काढू शकत नाहीत, तसेच कोणाच्या वाहनाची हवाही काढू शकत नाहीत. त्यांना तसे करण्याचा अधिकार नाही. याशिवाय चेकिंगदरम्यान पोलिस तुमच्याशी गैरवर्तनही करू शकत नाहीत. कोणताही पोलिस तुम्हाला विनाकारण त्रास देत असेल किंवा तुमच्याशी गैरवर्तन करत असेल तर तुम्ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे तक्रार करू शकता.

या गोष्टी लक्षात ठेवा

चेकिंग करताना पोलिसांनी नेहमी गणवेशात असणे गरजेचे आहे. जर तसे नसेल तर तुम्ही त्यांना ओळखपत्र दाखवण्यास सांगू शकता. त्यांनी आयडी दाखवण्यास नकार दिल्यास, तुम्ही त्यांना तुमची कागदपत्रे दाखवण्यासही नकार देऊ शकता. चलन कापताना नेहमी पोलिसांकडे चलन बुक किंवा ई-चलान मशीन असणे आवश्यक असते. जर ते दोन्ही नसेल तर तुमचे चलन कापले जाऊ शकत नाही. वाहतूक पोलिसांनी तुमची कागदपत्रे जप्त केली तर त्याची पावतीही घ्यावी.

ही कागदपत्रे नेहमी सोबत ठेवा…

  • नोंदणी प्रमाणपत्र ( आरसी)
  • प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी)
  • विमा दस्तऐवज
  • वाहन परवाना 

मराठीतील सर्व ऑटो ( Auto ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 20-09-2022 at 11:04 IST
Next Story
चाहत्यांना अजून खिसा सैल करावा लागणार, महिंद्राने मागणी वाढलेल्या ‘या’ दोन वाहनांच्या किंमतीत केली इतकी वाढ