Car Tips: आपली गाडी कितीही जुनी झाली तरीही ती नेहमी नव्यासारखी दिसायला हवी असे प्रत्येकाला वाटते. पण, त्यासाठी कारची वेळोवेळी काळजी घेणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच त्याचे दोन फायदे आहेत. पहिला असा की, यामुळे कार चालवण्यास कोणतीही अडचण येणार नाही, कार अधिक मायलेज देईल आणि कारमध्ये प्रवास करणेदेखील सुरक्षित असेल. दुसरा फायदा म्हणजे तुम्ही तुमची कार विकायला गेलात तर तुम्हाला तुमच्या कारची चांगली किंमत मिळेल.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

जर तुम्हाला कार वर्षानुवर्षे नवी असल्यासारखी चालवायची असेल आणि तुम्हाला यासाठी खर्चदेखील कमी करायचा असेल, तर काही मूलभूत गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. कारच्या मेंटेनन्सशी संबंधित काही छोट्या गोष्टींकडे व्यवस्थित लक्ष दिल्यास कार खराब होत नाही, शिवाय ती नेहमी नव्यासारखी दिसते.

जुनी कार नव्यासारखी दिसण्यासाठी खास टिप्स

जुनी कार नव्यासारखी दिसण्यासाठी कारमधील मॅट बदलल्यास कारला नवीन लूक येईल, कारण जुन्या मॅट्समध्ये धूळ आणि घाण असते. अशा परिस्थितीत नवीन मॅट्स खरेदी करून त्यांना कारमध्ये बसवल्यास नवीन लूक तर मिळतोच, शिवाय कार अधिक चांगल्या प्रकारे स्वच्छ राहते.

जेव्हा तुम्ही घरी गेल्यावर कार पार्क कराल तेव्हा ती चांगल्या दर्जाच्या कव्हरने झाकून ठेवा. यामुळे पाणी आणि डागांपासून कारचे संरक्षण होईल, यामुळे कारला गंज लागणार नाही, तसेच कारचा रंग फिका पडणार नाही. तसेच कारचा पेंट नवीन दिसण्यासाठी वर्षातून किमान तीन वेळा मेण लावा.

जुन्या कारमध्ये सीट कव्हर अनेकदा खराब होतात किंवा खूप घाण होतात. अशा स्थितीत कारमधील सीट कव्हर बदलले तर जुनी कारही नवीन दिसायला लागते. यासाठी बाजारात अनेक प्रकारचे दर्जेदार सीट कव्हर उपलब्ध आहेत.

कमी अंतरावर जावे लागत असेल तर कार घेऊन जाणे टाळा, कारण कमी अंतरावर जाण्यासाठी जास्त तेल वापरले जाते, तसेच यामुळे कारचे नुकसान होते आणि त्याचे आयुष्यदेखील कमी होते. हिवाळ्यात कारने जवळचा प्रवास करणे शक्यतो टाळा, कारण या दिवसात तेल पूर्णपणे गरम होत नाही.

जेव्हा इंजिन ऑइल कमी असेल तेव्हा इंजिनमध्ये जास्त घर्षण होते, यामुळे केवळ इंजिनचे आयुष्य कमी होत नाही तर कार सीज होण्याचा धोकाही वाढतो, त्यामुळे वाहनाचे इंजिन तेल नेहमी तपासत रहा.

कारचा ड्राईव्ह बेल्ट आणि टायमिंग बेल्ट योग्य असणे खूप महत्त्वाचे आहे. जर बेल्ट घासलेला असेल किंवा कापला असेल तर त्याचा इंजिनवर भार पडतो, शिवाय यामुळे कारदेखील सुरळीत चालणार नाही, त्यामुळे या दोन्ही गोष्टी नियमित तपासल्या पाहिजेत.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Follow the tips to look like an old car as shiny like a new car sap