India’s Most Affordable Bike: टू व्हिलर सेक्टरमध्ये कमी खर्चात जास्त मायलेज देण्याचा दावा करणाऱ्या दुचाकीची संख्या सर्वात जास्त आहे.या मायलेज दुचाकीच्या रेंजमध्ये, Hero MotoCorp पासून TVS Motors पर्यंतच्या दुचाकी आहेत. तु्म्हाला भारतातील सर्वात स्वस्त दुचाकी माहितीये का? हिरो एचएफ (Hero HF) 100 ही सर्वात स्वस्त दुचाकी आहे जी मायलेज तसेच त्याच्या किंमतीमुळे आणि साध्या सुंदर डिझाइनमुळे अनेकांना आवडते.
जर तुम्ही कमी किंमतीमध्ये जास्त मायलेज देणाऱ्या नवीन दुचाकी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर हिरो एचएफ 100 चांगला पर्याय आहे. आज आपण हिरो एचएफविषयी जाणून घेणार आहोत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हिरो एचएफ 100 – किंमत

एचएफ 100 कंपनी हिरो MotoCorpची सर्वात स्वस्त एंट्री-लेव्हल कम्यूटर दुचाकी आहे. जी संपूर्ण भारतात सर्वात कमी किंमतीमध्ये तुम्ही खरेदी करू शकता. या दुचाकीची सुरुवातीची किंमत ५९, ०१८ रुपये (एक्स शोरूम,दिल्ली) आहे आणि ऑन रोडसाठी याची किंमत ६८, ३६० रुपये आहे.

हिरो HF 100 – इंजिन

हिरो एचएफ 100 मध्ये कंपनीने एचएफ डिलक्सचा ९७.२cc चा सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन लावला आहे जो कंपनीचा सर्वात लोकप्रिय आणि बेस्ट सेलिंग दुचाकी हिरो स्प्लेंडरमध्ये सुद्धा उपलब्ध आहे. या इंजिनचा ४ स्पीड ट्रान्समिशनसह जोडला आहे. जो ८००० आरपीएमवर ८.०२ पीएस पावर आणि ६००० आरपीएमवर८.०५ एनएमचा टॉर्क निर्माण करतो.

हिरो HF 100 – मायलेज

हिरो एचएफ 100 एक लीटर पेट्रोल वर ७० किलोमीटरचा मायलेज देते या मायलेजला ARAI द्वारा प्रमाणित करण्यात आले आहे.

हिरो HF 100 – सस्पेंशन और ब्रेक

हिरो मोटोकॉर्प ने HF 100 मध्ये पुढच्या बाजूला टेलिस्कोपिक फॉर्क आणि मागच्या बाजूला 2-स्टेप एडजस्टेबल हायड्रोलिक कॉइल स्प्रिंग चा सेटअप दिला आहे. हिरो HF 100 मध्ये 18-इंचीचा अलॉय व्हिल आहे ज्यामध्ये दोन्ही बाजूला पातळ २.७५-१८ टायर जोडण्यात आले आहे. HF 100 चा फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हील मध्ये १३० एमएमचा ड्रम ब्रेक सेटअप दिला आहे.

हिरो HF 100 – डायमेन्शन

हिरो एचएफ 100 165 एमएमचा ग्राउंड क्लियरन्स मिळतो ज्याबरोबर ८०५ एमएम सीटची उंची मिळेल.

हिरो HF 100 – फीचर्स

हिरो एचएफ 100 ही आपल्या देशातील सर्वात जास्त स्वस्त कार आहे. याशिवाय या दुचाकीमध्ये मिळणारे बेसिक फीचर्समध्ये इंजिन कट-ऑफ, साइड स्टँड इंजिन कट-ऑफ आणि ७३५ मिमी लांब सीट, डुअल पॉड ऑल एनालॉग इंस्ट्रूमेंट कन्सोल आहे ज्यामध्ये स्पीडोमीटर, ओडोमीटर आणि फ्यूअल गेजचा फीचर मिळते.

हिरो HF 100 – स्पर्धक

हीरो एचएफ 100 या सेगमेंटमध्ये थेट सामना होंडा शाइन 100, बजाज प्लाटिना 100 आणि टिव्हीएस स्पोर्टबरोबर होणार.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero hf 100 the cheapest bike in india 70 km milage in one litre check price features and designs ndj