Top 5 Two Wheeler Sales: आर्थिक वर्ष २०२४ चा पहिला महिना (एप्रिल २०२३ – मार्च २०२४) दुचाकी विभागासाठी उत्तम ठरला आहे. टॉप १० यादीत समाविष्ट असलेल्या मोटारसायकल आणि स्कूटरच्या विक्रीत वार्षिक २३.७९ टक्के वाढ झाली आहे. एप्रिल २०२२ मध्ये ८,२८,६४३ युनिट्सच्या तुलनेत एप्रिल २०२३ मध्ये टॉप १० दुचाकींची विक्री १०,२५,७८२ युनिट्स होती. हिरो स्प्लेंडर ही सर्वाधिक विकली जाणारी बाईक असू शकते, परंतु बजाजच्या पल्सरनेही तिसरा क्रमांक पटकावला आहे.
आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Already have a account? Sign in
पाहा टाॅप ५ दुचाकी विक्री
- Hero Splendor आणि Honda Activa यांनी एप्रिल २०२३ मध्ये बजाज पल्सरसह दुचाकी विक्रीमध्ये पुन्हा एकदा या विभागात राज्य केले. एप्रिल २०२३ मध्ये, स्प्लेंडरची विक्री १३.३० टक्क्यांनी वाढून २,६५,२२५ युनिट्स झाली. स्प्लेंडरचा बाजारातील हिस्सा २५.८६ टक्के राहिला आहे.
(हे ही वाचा : देशातील सर्वात सुरक्षित कार मिळणार ६० हजारात, १ लिटर पेट्रोलमध्ये धावेल २७.३ किमी, पाहा कुठे मिळतेय शानदार डील )
- Honda Activa एप्रिल २०२३ मध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. Activa ने ५०.६० टक्के वाढीसह २,४६,३५७ युनिट्सची विक्री केली आहे. या यादीत Activa चा सध्या २३.९८ टक्के हिस्सा आहे. कंपनी आता पुढील वर्षी Activa इलेक्ट्रिक स्कूटर लाँच करण्याचा विचार करत आहे. Activa Electric ची स्पर्धा TVS iQube आणि बजाज चेतकशी असेल.
- बजाज पल्सर तिसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याची विक्री एप्रिल २०२३ मध्ये १५०.५९ टक्क्यांनी वाढून १,१५,३७१ युनिट्सवर गेली आहे. NS160, NS200 आणि 220 ने पल्सर विक्रीत प्रभावी योगदान दिले आहे.
- यानंतर चौथ्या क्रमांकावर होंडा सीबी शाईन आणि पाचव्या क्रमांकावर हिरो एचएफ डिलक्स बाईक आहे. एप्रिलमध्ये होंडा सीबी शाइनच्या विक्रीत घट झाली असून, ८९,२६१ युनिट्सची विक्री झाली. त्याचप्रमाणे एचएफ डिलक्सच्या विक्रीत २१.७७ टक्के घट झाली आहे.
First published on: 21-05-2023 at 17:21 IST
मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hero splendor and honda activa once again ruled this segment along with the bajaj pulsar splendor sales improved by 13 30 percent pdb