Honda NX200 Features And Price : ॲडव्हेंचर टूरिंग सेगमेंटने गेल्या काही वर्षांत भारतीय बाईक्सना बरीच चालना मिळवून दिली आहे. म्हणूनच गेल्या वर्षी कंपनीने वेगवेगळ्या ॲडव्हेंचर मोटरसायकल लाँच केल्या आहेत. तर होंडा मोटारसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) आता भारतात होंडा एनएक्स २०० (Honda NX200) लाँच केली आहे. तर या नवीन स्कूटरमध्ये काय असणार खास? फीचर्स आणि किंमत काय असणार याबद्दल सविस्तर जाणून घेऊया…

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

डिझाईन आणि फीचर्स

होंडा एनएक्स २०० (Honda NX200) ला एक उंच विंडस्क्रीन आणि सोनेरी कलरचा फोर्क असलेला मोठा फ्रंट एंड मिळतो. मस्क्यूलर फ्यूल टॅंक बाईकला खूप अट्रॅक्टिक लुक देतो आहे. त्याचप्रमाणे व्हिज्युअल हायलाइट्स स्प्लिट सीट्स, knuckle गार्ड्स, फ्लोटिंग टेल सेक्शन, स्प्लिट पिलियन ग्रॅब रेल, इंजिन संप गार्ड आणि स्टबी अपस्वेप्ट एक्झॉस्ट मफलर आदी अनेक गोष्टी तुम्हाला तुम्हाला होंडा एनएक्स २०० मध्ये दिसतील.

Honda NX200 व्हेरियंटसह तीन रंग पर्याय सुद्धा ऑफर करते आहे, यामधे ॲथलेटिक ब्लू मेटॅलिक, रेडियंट रेड मेटॅलिक आणि पर्ल इग्नियस ब्लॅक आदींचा समावेश आहे. फीचर्सच्या बाबतीत सांगायचे झाल्यास Honda NX200 मध्ये रायडरला नेव्हिगेशन, कॉल नोटिफिकेशन्स आणि एसएमएस अलर्ट प्राप्त करण्यासाठी ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि Honda RoadSync ॲपसह सुसंगत ४.२ इंचाचा पूर्ण-डिजिटल TFT डिस्प्ले आहे. यूएसबी सी प्रकार चार्जिंग पोर्ट आणि होंडा सिलेक्टेबल टॉर्क कंट्रोल (HSTC) जो ट्रॅक्शन कंट्रोलसाठी फायदेशीर आहे.

हार्डवेअर आणि पॉवरट्रेन स्पेक्स

सस्पेन्शन ड्युटी अपसाइड डाउन फ्रंट फोर्क्स आणि प्रीलोड ॲडजस्टेबल रिअर मोनोशॉकद्वारे हाताळल्या जातात. अँकरेजची काळजी 276mm फ्रंट डिस्क आणि मागील 220mm डिस्क ड्युअल-चॅनल ABS द्वारे घेतली जाते. NX200 १७ इंच मिश्र धातुच्या चाकांवर दोन्ही टोकांवर फिरते जे सुचविते की ते केवळ रोड बायस्ड टूरर आहे. याला 167 mm चा ग्राउंड क्लीयरन्स, १२ लिटर क्षमतेची फ्यूल टॅंक मिळते आणि तिचे वजन 147kg कर्ब आहे.

Honda NX200 ला पॉवरिंग 184.4cc सिंगल सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन आहे जे 17bhp आणि 15.7 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन स्लिप आणि असिस्ट क्लचद्वारे ५ स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. नवीन होंडा एनएक्स २०० ची किंमत १,६८,४९९ रुपये (एक्स-शोरूम, दिल्ली) आहे. तर अशी होंडा एनएक्स २०० (Honda NX200) ची खासियत आहे.

मराठीतील सर्व ऑटो बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Honda nx200 launched in india with three colours bookings are already open and deliveries are expected to begin in march asp